breaking-newsपिंपरी / चिंचवड
स्थायी समितीच्या बैठकीत विकासकामांच्या खर्चाला मंजुरी
पिंपरी| महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत विविध विकास कामांसाठी येणा-या सुमारे ५६ लाख २३ हजार इतक्या रकमेच्या खर्चास आज मंजुरी देण्यात आली.
सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती संतोष लोंढे होते. तसेच पी.एम.पी.एम.एल. ला संचलन तूट भरून काढण्यासाठी महानगरपालिकेकडून १० कोटी ५० लाख इतकी रक्कम देण्यासही बैठकीत मान्यता देण्यात आली.
कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजना विषयक माहिती नागरिकांना देण्यासाठी येणा-या २ लाख ८३ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागास विद्युत मोटर्स दुरूस्ती व रिवायंडिंग करिता येणा-या ३८ लाख २८ हजार इतक्या खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.