breaking-newsपिंपरी / चिंचवड

अपंग कल्याणकारी योजनांच्या सहायक आयुक्तपदी संभाजी ऐवले, अपंगांकडून सत्कार

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाच्या अपंग कल्याणकारी योजनांसाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्त म्हणून संभाजी ऐवले यांची निवड झाल्याबद्दल प्रहार अपंग क्रांती आंदोलन पिंपरी-चिंचवड शहर यांच्यातर्फे अधिकारी ऐवले यांचा सत्कार करण्यात आला.

याप्रसंगी उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, रामचंद्र तांबे, राजाराम पाटील, ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासह प्रहारसैनिक उपस्थित होते. अपंग कल्याणकारी योजनांचा कारभार संभाळण्यासाठी स्वतंत्र सहाय्यक आयुक्तांची नेमणूक करणारी पिंपरी-चिंचवड महापालिका ही पहिलीच महापालिका आहे.

नगरविकास विभाग महाराष्ट्र शासन निर्णय 14 नोव्हेंबर 2017 नुसार प्रहार अपंग क्रांती आंदोलन तर्फे वेळोवेळी महापालिकेकडे मागणी करून ती पूर्ण करण्यासाठी आंदोलनही करण्यात आले होते. 20 जानेवारी 2020 रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेमध्ये अपंग कल्याणकारी योजनांकरिता स्वतंत्र सहाय्यक आयुक्त म्हणून संभाजी ऐवले यांची नियुक्ती करणेबाबतचा ठराव मंजूर करण्यात आला.

या नियुक्तीमुळे शहरातील अपंगांच्या समस्या त्वरित सुटतील व अपंगांसाठी राखीव ठेवण्यात येणारा पाच टक्के निधी पूर्ण खर्च होईल, अशी अपेक्षा उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी याप्रसंगी व्यक्त केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button