breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

स्थलांतरित, दुबार- मयत पाच हजार मतदार पिंपरी विधानसभेतून वगळणार

महानगरपालिका सर्वसाधारण सभेपुढे अवलोकनार्थ प्रस्ताव 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण 399 यादी भागामधील स्थलांतरित, दुबार, मयत मतदारांची वगळणीचे काम सुरु आहे. त्यानूसार 206 पिंपरी विधानसभेतील मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून मतदारांना नोटीस बजावून त्यांचे जाबजबाब, पंचनामे करुन छाननी सुरु आहे. त्यामुळे संबंधित यादीतील सुमारे चार हजार 645 मतदार वगळण्यास पात्र असल्याने त्या मतदारांना वगळण्यात येणार आहे. 

राज्य मुख्य निवडणूक अधिकारी यांच्या 10 मे 2018 नुसार 1 जानेवारी 2019 या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्र मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषित करण्यात आला आहे. त्यानूसार 206 पिंपरी विधानसभा मतदार संघाच्या एकूण 399 यादी भागातील स्थलांतरित, दुबार, मयत मतदारांची वगळणीचे काम सुरु आहे. हे काम मतदान केंद्रस्तरीय अधिका-याकडून सुरु आहे. स्थलांतरित, दुबार सर्व मतदारांना नोटीस बजाविण्यात आल्या असून प्राप्त पंचनामे यांची छाननी करुन पहिल्या टप्प्यात यादीनूसार 4 हजार 645 मतदार वगळणीस पात्र आहेत.

याबाबत त्या मतदारांच्या नावाची यादी मुख्य निवडणूक आयोग, पुणे जिल्हाधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका या तिन्हीही वेबसाईटवर अवलोकनार्थ ठेवले आहे. या वगळणी कार्यक्रमाचा व्यापक प्रसिध्दीचा भाग म्हणून प्रस्तावित वगळणी करण्यात येणारे मतदारांची यादी महापालिकेच्या सर्वसाधारण सभेपुढे ठेवले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button