breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच; ‘या’ ज्येष्ठ नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई : राष्ट्रवादीतील मेगाभरतीवरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांच्या पक्ष प्रवेशानंतर अजित पवार आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भाजपा फोडण्याचा इशारा दिला आहे. यावर आता छगन भुजबळ यांनी मोठे संकेत दिले आहेत. 

काही दिवसांपूर्वीच हातकणंगले मतदार संघातील जनसुराज्य पक्षाचे नेते, माजी आमदार राजीव आवळे यांना आज उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पवार, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळी उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये गेलेल्या नेत्यांना ‘घरवापसी’ची साद घातली.

यानंतर भाजपाने यावर टीका करण्यास सुरुवात केली. अजित पवार आणि जयंत पाटलांनी १० पेक्षा जास्त आमदार आमच्या संपर्कात असल्याचे सांगितल्याने भाजपाने लगेचच प्रत्यूत्तर देण्यास सुरुवात केली. तुमचे आघाडी सरकार उत्तम चालले आहे. मग का आमच्या लोकांना आकर्षित करता? तुम्ही सरकार चालवा, आम्ही विरोधी पक्ष सांभाळू, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दिली. 

आता भुजबळ यांनी भाजपातील ७० टक्के आमदार आमचेच आहेत, असा गौप्यस्फोट करत याबाबत शरद पवार निर्णय घेतील, असा इशारा दिला आहे. आजी माजी आमदार महाविकास आघाडीत येण्याची इच्छा शरद पवार यांच्याकडे व्यक्त करत जरी असतील, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात कोणाला घ्यायचे कोणाला थांबवायचे हे शरद पवार ठरवतील, असेही भुजबळ म्हणाले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button