breaking-newsआंतरराष्टीय

सौदीतील शिखर परिषदेत १५ अब्ज डॉलरचे करार

  • भारतातर्फे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह प्रमुख उद्योगपतींचा सहभाग

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जागतिक पातळीवरील अनेक नेत्यांच्या उपस्थितीत येथे तीन दिवसांच्या उच्चस्तरीय आर्थिक शिखर परिषदेत १५ अब्ज डॉलरहून अधिक रकमेच्या २३ गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्याचे मंगळवारी सौदी अरेबियाने जाहीर केले.

सौदीचे राजपुत्र मोहम्मद बिन सलमान यांच्या पुढाकाराने ‘दाव्होस इन द डेझर्ट’ या भविष्यातील गुंतवणूक पुढाकार कार्यक्रमात हे करार करण्यात आले. मोहम्मद बिन सलमान यांनी ‘व्हिजन २०३०’ योजना आखली आहे, त्यानुसार केवळ पेट्रोलियम उत्पादनांवर अवलंबित्व कमी करतानाच सौदीच्या अर्थव्यवस्थेमध्ये वैविध्यता आणण्याचे ठरविले आहे.

एकूण १५ अब्ज डॉलरहून अधिक मूल्य असलेले करार रियाधमधील रिट्झ-कार्लटन हॉटेलमध्ये करण्यात आले. सौदी अरेबियाने जागतिक पातळीवर गुंतवणूकदारांसमोर जे प्रस्ताव ठेवले आहेत त्याचे प्रतिबिंब करारांमध्ये आहे, असे द सौदी अरेबियन जनरल इन्व्हेस्टमेण्ट अ‍ॅथॉरिटीने (एसएजीआयए) एका निवेदनात म्हटले आहे. तीन दिवसांच्या या शिखर परिषदेत सरकार, वित्तपुरवठादार, उद्योग क्षेत्रातील बडे नेते सहभागी होणार असून ते आगामी दशकात जागतिक व्यापार, संधी, आणि आव्हाने या बाबत चर्चा करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button