breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सोसायटी सभासदासाठी ‘वाकड प्रीमिअर लीग’ क्रिकेट सामन्यांचे आयोजन

स्थायीच्या माजी सभापती ममता गायकवाड व माजी नगरसेवक विनायक गायकवाड यांचा उपक्रम

पिंपरी |महाईन्यूज|

वाकड, पिंपळे निलख परिसरातील सोसायटी सभासदासाठी वाकड प्रिमियर लीग क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. सलग दोन वर्षे झाले या स्पर्धेचे आयोजन करण्यात येत आहे. यंदाच्या क्रिकेट सामन्यांत कोण बाजी मारणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

‘वाकड प्रीमियर लीग’ परिसरातील सोसायटी सभासदांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता आहे. या सामन्यांमध्ये महिल व पुरुष स्पर्धेकाची स्वतंत्र टीम आहे. सर्व सोसायटीमधील सभासद यामध्ये सहभागी होतात. वाकड प्रीमियर लीगसाठी यावेळेस कोण जिंकणार याची उत्सुकता लागली आहे.

याबाबत नंदन इंस्पेरा सोसायटीचे सचिन लोंढे म्हणाले की, “आमच्या सर्व आयटी वर्गासाठी एक खेळाचे वातावरण तयार केला आहे. एक नाविन्यपूर्ण उपक्रम विनायकदादांनी सुरु केला आहे. त्यामुळे आमची सोसायटी यावर्षीचा वाकड प्रीमिअर लीगचा क्रिकेट सामना आपल्याच सोसायटीने जिंकायचा या निर्धाराने आम्ही गेली २ महिने सराव करीत आहोत

स्थायी समिती माजी सभापती ममता गायकवाड म्हणाल्या कि “वाकड परिसरात आयटी क्षेत्रातील सभासद मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि एक खेळाचे वातावरण तयार व्हावे याकरिता आम्ही २ वर्षांपूर्वी हा उपक्रम चालू केला आहे. आम्हाला सर्व सोसायटीमधील सभासदांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. पहिल्या वर्षी ५४ टीम सहभागी होत्या. यंदा वाकड क्रिकेट लीगची उत्सुकता सर्वांना आहे. यावेळेला शंभरहून अधिक टीम सहभागी होतील. त्यानूसार सर्व नियोजन केले आहे. क्रिकेट सामन्यांचा सर्व सोसायटीने आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button