breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
सोलापुरात मतदानाला गालबोट, बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण
सोलापूर – राज्यात विधानसभा निवडणुकीच्या मतदान सुरळीत पार पडत असताना करमाळ्यात मात्र मतदानाला गालबोट लागलं आहे. करमाळ्यातील शिवसेनेचे बंडखोर उमेदवार नारायण पाटील यांच्या कार्यकर्त्याला जबर मारहाण करण्यात आली आहे. अपक्ष उमेदवार संजय शिंदे यांनी ही मारहाण केल्याचा आरोप नारायण पाटील यांनी केला आहे.