breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

आमदार लक्ष्मण जगताप यांनी मुलीसह बजावला मतदानाचा हक्क

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार लक्ष्मण जगताप यांनी सोमवारी (दि. २१) मतदानाचा हक्का बजावला. आमदार जगताप यांनी पिंपळेगुरव येथील महापालिकेच्या शाळेत, मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक सागर आंगोळकर, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, उद्योजक माऊली जगताप यांच्यासह मतदान केले.

पिंपरी-चिंचवड शहतील चिंचवड, भोसरी आणि पिंपरी या तीनही विधानसभा मतदारसंघात सोमवारी (दि. २१) सकाळी सात वाजल्यापासून मतदानाला सुरूवात झाली आहे. भाजप शहराध्यक्ष तसेच चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार आमदार लक्ष्मण जगताप यांनी पिंपळेगुरव येथील महापालिकेच्या शाळेत सोमवारी सकाळी मतदानाचा हक्का बजावला.

आमदार जगताप यांनी मुलगी ऐश्वर्या रेणुसे-जगताप, बंधू माजी नगरसेवक शंकर जगताप, नगरसेवक सागर आंगोळकर, प्रभाग स्वीकृत सदस्य महेश जगताप, उद्योजक माऊली जगताप यांच्यासह मतदान केले. मतदारांनी घराबाहेर पडून मतदानाची जास्तीत जास्त टक्केवारी वाढवून राष्ट्रीय कर्तव्य बजवावे, असे आवाहन आमदार जगताप यांनी मतदानानंतर केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button