breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सोन्याच्या तस्करीप्रकरणी केरळच्या मुख्यमंत्र्यांच्या प्रधान सचिवांना हटविले

तिरुवनंतपुरम | रविवारी कस्टम अधिकाऱ्यांनी तिरुवनंतपुरम विमानतळावर छापा मारून 15 कोटी रुपयांचे 30 किलो सोने जप्त केले होते. विमानतळावरील डिप्लोमॅटिक कार्गोतर्फे हे सोने दुबईला पाठविले जात होते. याप्रकरणी पोलिसांनी ‘केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड’मध्ये काम करणाऱ्या स्वप्ना सुरेश या तरुणीला अटक केल्यावर या सोन्याच्या तस्करीचे धागेदोरे केरळचे मुख्यमंत्री पी. विजयन यांचे प्रधान सचिव एम. शिवशंकर यांच्यापर्यंत जाऊन पोहोचले. त्यामुळे मुख्यमंत्री पी. विजयन यांनी प्रधान सचिव एम. शिवशंकर यांना तात्काळ पदावरून हटविले.

एम शिवशंकर हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव होतेच, त्याचप्रमाणे ते केरळ स्टेट इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडचे अध्यक्षही होते. एम. शिवशंकर हे मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव असल्यामुळे केरळमधील विमानतळे आणि बंदरांतून कुठच्याही मालाची तपासणी न करता ने-आण करण्याचे अधिकार त्यांच्याकडे होते. यालाच डिप्लोमॅटिक कॉर्गो किंवा डिप्लोमॅटिक चॅनेल असे म्हणतात. त्याचाच वापर करून स्वप्ना सुरेश हिने सोन्याची तस्करी चालविली होती.

रविवारी तिरुवनंतपुरम विमानतळावर 30 कोटींचे सोने मिळताच स्वप्ना सुरेश हिला कामावरून काढून टाकण्यात आले. मात्र विरोधी पक्षांनी मुख्यमंत्र्यांचे कार्यालय हेच सोन्याच्या तस्करीच्या रॅकेटचे केंद्र असल्याचा आरोप केल्यानंतर मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव एम. शिवशंकर यांना आज हटविण्यात आले. त्यांच्या जागी आयएएस अधिकारी मीर मोहम्मद अली यांची नियुक्ती करण्यात आली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button