breaking-newsताज्या घडामोडीपुणे
शांततेसाठी पिंपरीत काँग्रेसचे उपोषण
पिंपरी- सामाजिक समता, बुंधुता आणि शांतता टिकवून ठेवण्यासाठी काॅंग्रेसने राज्यव्यापी एक दिवसीय उपोषण सुरू केले आहे. पिंपरी-चिंचवड शहरातील काँग्रेसचे पदाधिकारी पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आज सकाळी उपोषणाला बसले आहेत. दिवसभर हे उपोषण सुरू राहणार आहे, अशी माहिती शहराध्यक्ष सचिन साठे यांनी सांगितली.