breaking-newsटेक -तंत्रताज्या घडामोडी

सॅमसंग गॅलेक्सी एम51 स्मार्टफोन भारतात लॉन्च; जाणून घ्या फिचर्स

सॅमसंग इंडियाने गॅलेक्सी एम51 (Galaxy M51) स्मार्टफोन औपचारिकरित्या भारतात लॉन्च केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 6.7 इंचाचा FHD+ Super AMOLED Plus Infinity-O Corning Gorilla Glass 3 डिस्प्ले देण्यात आला आहे. याचा आस्पेक्ट रेशो 20:9 इतका आहे. यात Qualcomm Snapdragon 730G चा प्रोसेसर देण्यात आला असून 8GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आला आहे.

या स्मार्टफोनमध्ये 64MP ची प्रायमरी लेन्स Sony IMX682 सेन्सरसह देण्यात आली आहे. 12MP चा अल्ट्रा व्हाईड एँगल कॅमेरा, 5MP चा मायक्रो स्नॅपर आणि 5MP चा डेप्थ सेन्सर देण्यात आला आहे. सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.

Galaxy M51 हा स्मार्टफोन दोन वेरिएंटमध्ये उपलब्ध आहे- 6GB रॅम+ 128GB इंटरनल स्टोरेज आणि 8GB रॅम+128GB इंटरनल स्टोरेज. ही मेमरी तुम्ही 512GB पर्यंत वाढवू शकता. या स्मार्टफोनमध्ये 7,000mAh ची बॅटरी 25W च्या फास्ट चार्जिंग आणि रिव्हर्स चार्जिंग सपोर्टसह देण्यात आली आहे.

विशेष म्हणजे हा स्मार्टफोन 0-100% पर्यंत bundled charger ने 115 मिनिटांत चार्ज होतो, असा कंपनीचा दावा आहे. हा स्मार्टफोन अॅनरॉईड 10 वर One UI Core 2.1 या ऑपरेटिंग सिस्टवर काम करतो. या स्मार्टफोनच्या 6GB आणि 128GB वेरिएंटची किंमत 24,999 रुपये असून 8GB आणि 128GB वेरिएंटची किंमत 26,999 रुपये इतकी आहे.


या स्मार्टफोनचा पहिला सेल 18 सप्टेंबर रोजी असणार आहे. Amazon.in आणि Samsung.com वर हा सेल दुपारी 12 पासून सुरु होईल. 18-20 सप्टेंबर दरम्यान एचडीएफसी बँक कार्डवरुन या डिव्हाईसची खरेदी केल्यास 2000 रुपयांचा डिस्काऊंट दिला जात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button