breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबई

द्रुतगती महामार्गावर सुसाट वाहनांच्या वेगाला उद्यापासून लगाम

मुंबई | महाईन्यूज

अपघात रोखण्यासाठी राज्यात वाहनांच्या वेगावर नव्याने मर्यादा आणण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सोमवार, १८ नोव्हेंबरपासून द्रुतगती महामार्गासह (एक्स्प्रेस वे), चार मार्गिका रस्ते आणि महापालिका हद्दीतील रस्त्यांवर केली जाईल, अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलिसांनी दिली.

द्रुतगती महामार्गावर आठपेक्षा कमी आसनी वाहनांसाठीची प्रतितास १२० किलोमीटरची वेगमर्यादा १०० पर्यंत खाली आणली आहे, तर नऊपेक्षा जास्त आसन क्षमतेच्या वाहनांची वेगमर्यादा प्रतितास १०० किमीवरून ८०वर आणली आहे. वेगमर्यादेचे उल्लंघन केल्यास वाहनचालकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व महामार्ग मंत्रालयाने एप्रिल २०१८ मध्ये एक अधिसूचना काढून वाहनांसाठी नवीन वेगमर्यादा ठरवली होती. एक्स्प्रेस वे सह, चार मार्गिकांचे रस्ते, पालिका हद्दीतील रस्त्यांसह अन्य रस्त्यांचा वापर करणाऱ्या वाहनांची वेगमर्यादा वाढवली होती.

त्यामुळे एक्स्प्रेस वे साठीची वेगमर्यादा आठ किंवा त्यापेक्षा कमी प्रवासी वाहन क्षमता असलेल्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटरहून प्रतितास १२० किलोमीटपर्यंत झाली. तर नऊ व त्यापेक्षा जास्त प्रवासी वाहून नेणाऱ्या वाहनांसाठी एक्स्प्रेस वे वर असलेली यापूर्वीची प्रतितास ८० ची मर्यादा १०० पर्यंत वाढवली. राज्यातील चार मार्गिका रस्त्यांसाठीच्या वाहनांसाठी प्रतितास १०० किलोमीटपर्यंत वेग मर्यादा आखली होती. मालवाहू वाहन, तीन चाकी व अन्य वाहनांसाठीही वेगमर्यादा निश्चित करताना त्यात वाढ केली. आता नवीन धोरणानुसार हा वेग आणखी कमी होणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button