breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

चिखलीतील 294 सदनिकांची सोडत, लाभार्थ्यांना मिळाले हक्काचे घर

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

केंद्र व राज्य शासनाच्या सहकार्याने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने प्राधिकरण सेक्टर क्र. १७ व १९ चिखली येथे आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकांसाठी घरकुल योजना राबविण्यात येत आहे. घरकुल प्रकल्पातील ७ सोसायट्यांच्या इमारतीमधील एकुण २९४ लाभार्थ्यांच्या सदनिकांची संगणकीकृत सोडत आज काढण्यात आली. ‌

आचार्य अत्रे रंगमंदिर, संत तुकाराम नगर, पिंपरी येथे झालेल्या संगणकीय सदनिका सोडत महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार यांच्या शुभ हस्ते काढण्यात आली. या कार्यक्रमास सहा.आयुक्त चंद्रकांत इंदलकर, (झोनिपु) प्रशासन अधिकारी नंदकुमार वाघ व मुख्य लिपिक सुनिल माने, राजेश जाधव, संगणक चालक सुजाता कानडे, उज्वला गोडसे, दिपक पवार, संगणक अभियंता संदिप भागवत, लिपिक योगिता जाधव, अंजली खंडागळे, सुवर्णा केदारी, संकेत लोंढे तसेच समन्वयक अशोक हंडीबाग, दर्शन शिरुडे, आश्विनी शिंदे व राजश्री शेंडगे यांच्यासह मोठ्या संख्येने लाभार्थी उपस्थित होते.

यावेळी नियोजित घरकुल सहकारी गृहरचना संस्थासाठी तात्पुरत्या स्वरुपात निवड करण्यात आलेल्या सोसायटी क्र. १३० इमारत क्र. डी-१ चे अध्यक्ष फिलिप मुरलीधर बागुल, सोसायटी क्र. १३१ इमारत क्र. सी-१५ चे अध्यक्ष संजय आण्णासाहेब शिंदे, सोसायटी क्र. १३२ इमारत क्र. सी-१४ चे अध्यक्ष महेश मच्छिंद्र सावंत, सोसायटी क्र. १३३ इमारत क्र. डी-२ चे अध्यक्ष दत्तात्रय नारायण गोळे, सोसायटी क्र. १३४ इमारत क्र. डी-४  चे अध्यक्ष अशोक गुंडिबा डोरले, सोसायटी क्र. १३५ इमारत क्र. डी-२७ चे अध्यक्ष राजाराम धारु कदम व सोसायटी क्र. १३६ इमारत क्र. डी-३ चे अध्यक्ष सुधाकर पुरुषोत्तम देशपांडे यांचा सहा.आयुक्त चंद्रकांत इंदलकर यांचे शुभहस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी लाभार्थींनी आता हक्काचे व स्वत:चे घर मिळाल्याने इमारतीमध्ये सलोख्याचे वातावरण निर्माण करावे. घराचा वापर स्वत: करावा. परिसर स्वच्छ ठेवावा. इमारती भोवती झाडे लावून त्याचे योग्य प्रकारे निगा व जतन करावे असे लाभार्थ्यांना महापौर राहुल जाधव यांनी संदेश दिला.

यावेळी  चंद्रकांत इंदलकर सहा.आयुक्त यांनी प्रकल्पाची माहिती, घराचा वापर, येणारे देयके व बँकेचे हप्ते वेळेवर भरणेबाबत मार्गदर्शन केले. जनसंपर्क अधिकारी रमेश भोसले यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन केले. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button