breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सुरतमध्ये एका इमारतीला आग लागून ७ विद्यार्थ्यांचा मृत्यू

गुजरातमधल्या सुरतच्या तक्षशिला इमारतीला आग लागून आत्तापर्यंत एकूण १५ जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सुमारे ७  विद्यार्थ्यांचा समावेश आहे असेही समजते आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने या संदर्भातले वृत्त दिले आहे. या इमारतीला  या इमारतीला लागलेल्या आगीपासून बचाव करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. काहीजण या इमारतीत अडकलेही आहेत. या इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर कोचिंग क्लास आहे. हा क्लास सुरू असतानाच अचानक आग लागली त्यामुळे विद्यार्थ्यांनी अडकलेल्या लोकांनी उड्या टाकल्या. तसेच इतर काही लोकांनीही इमारतीच्या दुसऱ्या आणि चौथ्या मजल्यावरून उड्या टाकल्या.

ANI

@ANI

Gujarat: A fire breaks out on the second floor of a building in Sarthana area of Surat; 18 fire tenders at the spot. More details awaited.

39 people are talking about this

View image on TwitterView image on Twitter

ANI

@ANI

Gujarat: A fire broke out on the second floor of a building in Sarthana area of Surat; 18 fire tenders at the spot. More details awaited.

114 people are talking about this

 

तक्षशिला इमारतीत बरीच शॉपिंग सेंटर्सही आहेत. त्यामुळे या ठिकाणी लोकांची गर्दीही असते. सध्या आग नियंत्रणात आणण्याचे काम आणि मदत व बचावकार्य सुरू आहे. या ठिकाणी अग्निशमन दलाच्या १८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आपला जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या चौथ्या आणि दुसऱ्या मजल्यावरून मुलांनी आणि लोकांनी उड्या टाकल्या आहेत. मदत आणि बचावकार्य सुरू आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यासंदर्भात ट्विट करत दुःख व्यक्त केले आहे. या दुर्घटनेत ज्यांचा मृत्यू झाला त्यांना दुःख सहन करण्याची ताकद देव देवो आणि जे जखमी झाले आहेत ते लवकरात लवकर बरे व्हावेत अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button