breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

सीरमची कोव्हिशील्ड लस तूर्तास भारतीयांनाच; निर्यातीवर बंदी

नवी दिल्ली – सीरमची ‘कोव्हिशील्ड’ आणि भारत बायोटेकची ‘कोव्हॅक्सीन’ या दोन लसींच्या आपत्कालीन वापराला मंजुरी दिल्यानंतर मोदी सरकारने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सरकारने कोव्हिशील्ड लसीच्या निर्यातीवर बंदी घातली आहे. त्यामुळे आता पुढील काही महिन्यांसाठी सीरमला कोव्हिशील्ड लस देशाबाहेर पाठवता येणार नाही. दरम्यान, भारताने निर्यातबंदी केल्याने गरीब देशांना आणखी काही काळ लसीसाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे.

वाचा :-देशातील कोरोनाबाधितांची संख्या 1,03,56,845 वर

भारत हा जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला दुसऱ्या क्रमांकाचा देश आहे. त्यामुळे केंद्र सरकार देशात कोरोनाची लागण झालेल्या लोकांपर्यंत लस पोहोचवण्यात कोणतीही कसूर राहू नये या प्रयत्नात आहे. या पार्श्वभूमीवर निर्यातबंदीचा निर्णय घेण्यात आला असून सीरमचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. महत्त्वाचे म्हणजे पूनावाला यांनी विकसनशील देशांसाठी सुमारे १०० कोटी डोस तयार करण्याचा करार केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button