breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

शहीद झालेल्या जवानांना महापालिकेच्या वतीने श्रध्दाजंली अर्पण

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड महानगरपालिका व कर्मचारी महासंघाच्या वतीने पुलवामा येथे केंद्रीय सुरक्षादलाच्या ताप-यावर दहशतवादयांनी केलेल्या हल्लयात शहिद झालेल्या जवानांना महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांच्या उपस्थित झालेल्या सभेत श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.

आज सकाळी पिंपरी चिंचवड भवनात श्रध्दांजली सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, नगरसदस्या शैलजा मोरे, नगरसदस्य विलास मडिगेरी, स्विकृत सदस्य माऊली थोरात, अतिरिक्त आयुक्त दिलीप गावडे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कर्मचारी महासंघाचे मनोज माछरे, चारुशिला जोशी उपस्थित होते.

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्यात शहिद झालेल्या जवानांच्या प्रती संवेदना व्यक्त करत पिंपरी चिंचवड महानगरपालिका नगरसेवक, नगरसेविका अधिकारी व कर्मचारी त्यांच्या कुटूंबियांच्या दुखात सामील असल्याचे महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांची सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button