breaking-newsराष्ट्रिय

सीबीआय पथकाला राजीवकुमार सापडेनात

कोलकाता : कोलकात्याचे माजी पोलिस आयुक्त राजीवकुमार यांचा शोध घेण्यासाठी गेलेल्या सीबीआय (केंद्रीय गुन्हे अन्वेषण) पथकाला हात हलवत परत दिल्लीत यावे लागले. शारदा चिट फंड घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या पथकाचे प्रमुख म्हणून काम करताना राजीवकुमार यांनी पुरावे गहाळ केले होते, असा आरोप त्यांच्यावर आहे.

राजीवकुमार यांच्या अटकेचे समन्स काढण्यात आले असून त्यांचा शोध चालू आहे. त्यांना ताब्यात घेण्यासाठी सीबीआयचे विशेष पथक कोलकात्याला १७ सप्टेंबर रोजी आले होते. त्यांनी शहरात अनेक ठिकाणी भेटी दिल्या पण ते सापडले नाहीत. सीबीआयच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले, की सीबीआयचे पथक कोलकात्याला गेले होते पण त्यांना काल परत यावे लागले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button