breaking-newsआंतरराष्टीय

‘सिमी’वरील बंदीला पाच वर्षे मुदतवाढ

५८ नवे गुन्हे दाखल झाल्याची दखल

देशामध्ये छुप्या पद्धतीने घातपाती कारवाया केल्याबद्दल स्टुडण्ट इस्लामिक मूव्हमेण्ट ऑफ इंडिया (सिमी) या संघटनेवरील बंदीची मुदत आणखी पाच वर्षांनी वाढविण्यात आली आहे.

सिमीकडून देशाला धोका असल्याने बंदीचा कालावधी वाढविण्यात आल्याचे केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे. यापूर्वी २०१४ मध्येही सिमीवरील बंदीचा कालावधी वाढविण्यात आला होता. सदर संघटना देशासाठी भविष्यातही घातक ठरू शकते, संघटनेमुळे देशाच्या समता आणि एकात्मतेला बाधा निर्माण होऊ शकते, त्यामुळे बंदी वाढविण्यात आल्याचे गृह मंत्रालयाने स्पष्ट केले आहे.

सिमीविरोधात देशामध्ये ५८ नवे गुन्हे दाखल झाल्याची दखल घेत बंदी वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. बंदीचा कालावधी ३१ जानेवारी २०१९ रोजी संपला, बंदी उठवावी की कालावधी वाढवावा यासाठी केंद्राने सर्व राज्यांकडून मते मागविली होती. त्यानंतर १५ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांनी सिमीवर बंदी घालण्याचे मत नोंदविले.

मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, तेलंगण आणि केरळ पोलिसांनी सिमीचा नेता सफदर नागोरी, अबू फैजल आणि अन्य दोषींविरोधातील तपशीलही केंद्राकडे सोपविला. दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याच्या आरोपावरून सिमीवर २०११ मध्ये बंदी घालण्यात आली होती, असे सांगण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button