breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावित्री उत्सवात महिलांचा सन्मान

विविध स्पर्धेतील महिलांना पारितोषकचे वाटप

पिंपरी | प्रतिनिधी

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांच्या १८९ व्या जयंती निमित्त “सावित्री उत्सव” पिंपरी चिंचवड महानगरपालिका भागात साजरी करण्यात आली. पिंपरी चिंचवड महानगरपलिका व महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मिशन स्वावलंबन’ प्रकल्पांतर्गत महिला बचत गटातील महिलासाठी सामाजिक जनजागृती कार्यक्रम दिनांक २५ डिसेंबर २०२० ते ०४ जानेवारी २०२१ पर्यंत आयोजित केले होते. या कार्यक्रमांतर्गत बचत गटातील महिलानासाठी विविध स्पर्धा व खेळ पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागामध्ये घेण्यात आले. या विविध स्पर्धा मध्ये १५०० महिलांनी सहभाग घेतला होता. या निमिताने या स्पर्धेतील विजेत्या महिलांचा सन्मान करण्यासाठी आचार्य आत्रे रंगमंदिर पिंपरी या ठिकाणी सावित्री उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महापौर उषा ढोरे व उदघाटक तसेच प्रमुख मार्गदर्शक आयुक्त श्रावण हर्डीकर उपस्थित होते.  या प्रसंगी सभापती चंदा लोखंडे (महिला व बालविकास समिती) व पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रभागातील नगरसेवक, तसेच उपआयुक्त नागरवस्ती विकास योजना विभाग अजय चारठाणकर, संभाजी ऐवले, सुहास बहादपूरे, वरिष्ठ जिल्हा समन्वय अधिकारी अर्चना क्षीरसागर, महिला आर्थिक विकास महामंडळ पुणे यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी महिलांना बचत गटाबाबत सखोल मार्गदर्शन केले. तसेच सभापती चंदा लोखंडे यांनी विजेत्या महिलांना शुभेच्छा दिल्या. नगरसेविका सुजाता पालांडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनातून महिलांना स्व:ताच्या स्व:ची जाणीव करून दिली. तसेच याप्रसंगी उप आयुक्त अजय चारठाणकर यांनी महिलांना मोलाचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात विजेता महिलांना मान्यवरांच्या हस्ते  प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाचे आभार कनक खरे प्रकल्प सल्लागार यांनी केले. या कार्यक्रमासाठी मिशन स्वावलंबन टीम यांनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button