पिंपरी / चिंचवड

चाकण मार्केट यार्डमधील बिअर शॉपी अज्ञात चोरट्यांनी फोडली

पिंपरी l प्रतिनिधी

चाकण मार्केट यार्ड येथे असलेली बियर शॉपी अज्ञात चोरटयांनी फोडली. बियर शॉपी मधून वेगवेगळ्या प्रकारची दारू चोरट्यांनी चोरून नेली. ही घटना सोमवारी (दि. 10) रात्री आठ ते मंगळवारी (दि. 11) सकाळी दहा वाजताच्या कालावधीत घडली.

अशोक ज्ञानोबा बिरदवडे (वय 60, रा. मार्केटयार्ड शेजारी, चाकण) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी बिरदवडे यांचे चाकण मार्केट यार्डमध्ये अजिंक्य बिअर शॉपी नावाचे दुकान आहे. सोमवारी रात्री आठ वाजता त्यांनी कुलूप लाऊन दुकान बंद केले. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या वरील बाजूचा सिमेंटचा पत्रा उचकटून बिअर शॉपीमध्ये प्रवेश केला.

दुकानातून 1800 रुपये रोख रक्कम, 7 हजार 200 रुपयांची सुला कंपनीची दारू, 960 रुपयांची सुला कंपनीची दारू, 1200 रुपये किमतीची डॉक्टर खास कंपनीची दारू असा एकूण 10 हजार 160 रुपयांचा माल चोरून नेला. हा प्रकार मंगळवारी सकाळी उघडकीस आला. पुढील तपास चाकण पोलीस करीत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button