breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावळागोंधळ : राज्य सरकारने पिंपरी-चिंचवडमधील कोरोनाबाधित २६ मृत्यू लपवले?

पिंपरी ।  मुंबईतील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आकडेवारी लपवल्याचे प्रकरण ताजे असतानाच आता पिंपरी-चिंचवडमधील मृतांची आकडेवारी कमी दाखवण्याचा प्रकार राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने केले आहे. ६ जुलैच्या आकडेवारीनुसार, राज्य सरकारने कोरोनाबाधित नागरिकांचे २६ मृत्यू लपल्याचे दिसत आहे.

राज्य सरकार आपल्या संकेतस्थळावर आरोग्य विभागाच्या माध्यमातून प्रत्येक शहर आणि जिल्ह्याची आकडेवारी देत असते. या यादीत सरकारकडून आकडेवारी लपविण्यात येत असल्याचे उघड झाले आहे. राज्य सरकारच्या संकेतस्थळावर आकडे पाहिल्यास स्थानिक पातळीवरील आकड्यांमध्ये तफावत दिसून येत आहे. राज्य सरकारने पिंपरी-चिंचवड शहरातील तब्बल एक हजाराहून अधिक रुग्ण आणि एकूण 26 करानोबाधितांचा मृत्यू लपवले आहेत.

राज्य सरकारने प्रसिद्ध केलेल्या यादीनुसार 5 जुलै रोजी पिंपरी चिंचवड महापालिका हद्दीमध्ये 176 बाधित रुग्ण सापडल्याचे दाखवले आहे. तसेच शहराची एकूण करोनाबाधित आकडेवारी 3 हजार 531 इतकी दिली आहे. मात्र प्रत्यक्षात त्यादिवशी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या ‘प्रेसनोट’मध्ये तब्बल 321 नवीन रुग्णांची नोंद आहे. विशेष म्हणजे, एकूण रुग्णसंख्या 4 हजार 288 इतकी झाल्याचे प्रसिद्धीपत्रकात दिले होते. महापालिकांच्या वतीने सायंकाळी पाच वाजेपर्यंत विभागीय आयुक्तांकडे रुग्णसंख्येची माहिती दिली जाते. त्यानंतर तीच माहिती महापालिका प्रसिद्धीपत्रकामधून प्रसिद्ध करते.

पिंपरी चिंचवड शहरात 3 जुलै रोजी 232 रुग्ण आढळले होते. तर एकूण रुग्णसंख्या 3 हजार 776 इतकी होती. 4 जुलै रोजी 191 नवीन रुग्णांसह एकूण संख्या 3 हजार 967 इतकी झाली होती. 2 जुलै रोजीच शहरातील एकूण रुग्णसंख्या 3544 इतकी झाली होती. मात्र तीन दिवसांनंतरही म्हणजेच 5 जुलैला सरकारने 3551 इतकीच रुग्णसंख्या दाखविली आहे. तर 6 जलै या दिवशी शहरात तब्बल 573 इतकी रुग्णसंख्या इतकी वाढली. मात्र सरकारने त्यादिवशीची फक्त 257 रुग्णसंख्या दाखवली. म्हणजेच चार दिवसांत 1 हजार 317 ने रुग्णसंख्या वाढली. मात्र सरकारने चार दिवसांत फक्त 257 रुग्ण वाढल्याचे दाखवले. जे की इकडे शहरात करोनाने हाहाकार उडालेला आहे. परंतु, राज्य सरकारकडून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या माहितीत आकड्यांचा खेळ सुरू आहे.

मृतांच्या आकडेवारीतही घोळ

पिंपरी चिंचवड शहरात 5 जुलै रोजी एकूण मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 93 होती. मात्र राज्य सरकारने एकूण 71 मृत्यू दाखवले आहेत. करोनामुळे मृत्यू झालेल्यांमध्ये शहरातील 61 तर शहराबाहेरील 32 जणांचा समावेश आहे. म्हणजेच सरकारने तब्बल 22 रुग्णांचे मृत्यू लपविले आहे. 3 जुलै रोजीच मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या 85 इतकी होती. तर दोन दिवसांनी सरकारने 71 मृतांची संख्या कशी दिली याबाबत प्रश्नहचिन्ह आहे. राज्य सरकारने 6 जुलैच्या प्रसिद्धीपत्रकात पिंपरी-चिंचवडमधील एकूण 73 रुग्णांचा मृत्यू दर्शविला. दुसरीकडे महापालिका प्रशासनाने 6 जुलै रोजी प्रसिद्ध केलेल्या पत्रकात शहरातील 67 आणि शहराबाहेरील परंतु शहरात उपचार घेत असलेल्या 32 अशा एकूण 99 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट केले होते. अर्थात 6 जुलै रोजी देखील राज्य सरकारने 26 मृत्यू लपविले का? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button