breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावधान….शहरात युके मधून ११५ प्रवासी दाखल

८५ जणांची तपासणी, ७० जणांचा अहवाल निगेटिव्ह, एक जण कोरोना पोझीटीव्ह  

पिंपरी | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरात युके देशातून एकुण 115 प्रवासी दाखल झाले आहेत. 15 प्रवाशांचे पत्ते अपूर्ण असल्यामुळे त्यांच्यापर्यंत अजुन वैद्यकीय विभागाचे कर्मचारी पोचले नाहीत. 85 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी केली आहे. त्यापैकी 70 जणांचा अहवाल नकारात्मक असून एकाचा अहवाल कोविड 19 करिता सकारात्मक आहे. उर्वरित 15 अहवाल अजून येणे बाकी असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या वतीने देण्यात आली.

ब्रिटनमध्ये कोरोनाच्या विषानुने आणखी हाहाकार पसरला आहे. त्यामुळे त्या शहरात लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्या पार्श्वभूमीवर राज्याने परदेशातील प्रवाशांना राज्यात यायला बंदी घातली आहे. आलेच तर यांच्यावर लक्ष ठेवण्याचे आदेश आरोग्य विभागाला देण्यात आलेले आहेत. त्या नुसार पिंपरी चिंचवड महापालिकेचा वैद्यकीय विभाग सज्ज झाला आहे. मात्र नुकतेच ब्रिटनमधून (युके) ११५ प्रवाशी पिंपरी चिंचवड मध्ये दाखल झाले आहेत. त्यामुळे प्रशासन खडबडून जागे झाले आहे. त्या प्रवाशांचे पत्ते शोधून त्यांची तपासणी केली जात आहे. ११५ पैकी 85 प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी वैद्यकीय विभागाने केली. त्यापैकी ७० जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असून त्यांना कोविड नसल्याचे निष्पन्न झाले. तर एकाचा अहवाल पोझीटीव्ह आला आहे. त्यांच्यावर उपचार सुरु करण्यात आला आहे. उर्वरित १५ अहवाल अजून येणे बाकी असल्याची माहिती वैद्यकीय विभागाच्या वतीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे देण्यात आली.  

१५ प्रवासी शहरातून गायब

परदेशातून आलेल्या प्रवाशांची वैद्यकीय विभागाकडून माहिती घेतली जात आहे. त्यानुसार त्यांची तपासणी केली जात आहे. मात्र ११५ प्रवाशांपैकी 15 प्रवासी पिंपरी चिंचवड शहाराबाहेर निघून गेले असल्याची माहिती वैद्यकीय विभागाने दिली. त्यामुळे त्या प्रवाशांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनापुढे आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button