breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सावधान…’नो विकास झोन’मध्ये जागा घेताय, नागरिकांनो तुमची होवू शकते ‘फसवणूक’

भोसरी, मोशी, दिघी आणि वडमुखवाडी परिसरात या सर्व्हे नंबरच्या जागा रेडझोन पट्ट्यात

पिंपरी|महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिका कार्यक्षेत्रात, नवनगर विकास प्राधिकरण परिसरात संरक्षण विभागाने ‘नो विकास झोन’ (रेडझोन) जाहीर केलेला आहे. त्या भागात बंदी असूनही गुंठेवारीनुसार सर्रासपणे जमीन विक्री सुरू आहे. परंतू, त्या भागात जमिन घेतल्यास सर्वसामान्य नागरिकांची फसवणूक होणार आहे.    

विशेषतः वडमुखवाडी, दिघी, भोसरी आणि मोशीतील जमिनींची नुकसानभरपाई मिळूनही अनेकांनी रेड झोनबाधित जमिनी बेकायदा विक्री करु लागले आहेत. सातबारा उताऱ्यावर रेड झोनचे शिक्के आहेत. तरीही मंडलाधिकारी आणि तलाठ्यांनी सातबाराच्या नोंदी बेकायदा केल्या आहेत. तसेच सहदुय्यम निबंधकाकडून खरेदी-विक्रीचे दस्तऐवज करु लागले आहे.

संरक्षण हद्दीतील अनेक जमिनींवर संरक्षण मंत्रालयाचे रेड झोनचे शिक्के आहेत. आजपर्यंत या जमिनीवरील आरक्षण उठविलेले नाही, तरीही मोठ्या प्रमाणात जमिनीची विक्री केली जात आहे. तसेच संरक्षण विभागाकडून जमीन अधिग्रहण केल्याबाबतची नुकसान भरपाईची रक्कमही अनेकांनी स्वीकारली आहे, तरीही जमिनी विकल्या जात आहेत.

गायरान जमिनींचीही विक्री सुरू आहे. दुय्यम निबंधक कार्यालयातही असे दस्त नोंदविले जात आहेत. लांडेवाडीच्या दुय्यम निबंधक कार्यालयात दस्त नोंदविण्यास नकार दिल्यावर एजंट अन्य निबंधक कार्यालयांत दस्त नोंदविण्यासाठी जात आहेत. चिरिमिरीपोटी गल्लेलठ्ठ रक्कम स्वीकारून नोंदणी केली जात आहे. वास्तविक शासकीय यंत्रणेच्या बेजबाबदारीमुळे जनतेची आर्थिक लूट होत आहे. 

जमिनीवर विविध विकासासाठी आरक्षण असतानाही आणि कोणतेही मंजूर रेखांकन नसतानाही बेकायदा दुय्यम निबंधकांकडून दस्त नोंदविले जातात. यामुळे महापालिका हद्दीत अनधिकृत बांधकामांची संख्या वाढली आहे. सरकारी यंत्रणांना अनधिकृत बांधकामाबाबत दोषी धरावे, अशी मागणीही अमोल उबाळे यांनी केली आहे. 

या सर्व्हे नंबरवर ‘रेडझोन

वडमुखवाडी – 80 ते 120 पर्यंत, 127, 162 ते 176 पर्यंत,

दिघी – 75,76,77,78

भोसरी – 113 ते 137 पर्यंत, 139, 140 ते 164 पर्यंत, 166 ते 169 पर्यंत, 171 ते 198 पर्यंत, 200 पै ते 207 पै पर्यंत

मोशी – जूने गट नंबर 450, 442,,445, 446,447,448,449, 450

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button