breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावधान! तुमच्या फेसबुक, व्हॉट्सऍप चॅटवर राहणार सरकारची नजर

नवी दिल्ली –  फेसबुक, व्हॉट्सऍप चॅट करताय, मग सावधान राहण्याची गजर आहे. कारण लवकरच आपल्या फेसबुक आणि व्हॉट्सऍप चॅटवर सरकारची नजर असणार आहे. देशातल्या सर्व गुप्तचर यंत्रणांना जनतेच्या खासगी कॉम्प्युटरवरच्या डेटावर नजर ठेवणे आणि चौकशी करण्याचा अधिकार बहाल करण्यात आला आहे. सरकारच्या माहितीनुसार, सूचना तंत्रज्ञान कायदा 69 A नुसार कोणत्याही संस्थान अथवा व्यक्तीनं देशविरोधी कृत्य केल्याचा संशय असल्यास त्या व्यक्तीच्या हालचालींवर लक्ष्य ठेवून त्याच्या कॉम्प्युटरमधील इतर डेटाची चौकशी करता येणार असून, त्या व्यक्तीवर कारवाई करण्यात येते. त्यामुळेच सरकार आता त्यापुढे जाऊन सूचना तंत्रज्ञान कायदा 79ची अंमलबजावणी करण्याची शक्यता आहे.

तसेच हा कायदा देशभरातील ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर लागू असणार आहे. हा कायदा लागू झाल्यानंतर फेसबुक, ट्विटर, व्हॉट्सऍप, शेअरचॅट, गुगल, ऍमेझॉन, याहू सारख्या कंपन्यांना एखाद्या यूजर्सची संपूर्ण माहिती द्यावी लागणार आहे. जर सरकारचा एखादा मेसेज, व्हिडीओ किंवा फोटो आक्षेपार्ह आढळल्यास त्याची माहिती अधिकारी सोशल मीडिया कंपनीकडून मागवू शकतात. तसेच त्या कंपन्यांनाही अँड टू अँड एंक्रिप्शनची सुरक्षा भंग करून सरकारला त्या युजर्सच्या डेटाची माहिती द्यावी लागणार आहे.

यासंदर्भात एक बैठक झाली असून, या बैठकीत सायबर क्राइम,  सूचना तंत्रज्ञान कायदा, गुगल, फेसबुक, व्हॉट्सऍप, ऍमेझॉन, याहू, ट्विटर, शेअरचॅट आणि सेबी यांचे प्रतिनिधी सहभागी होते. आता या कंपन्या भारतात नोडल अधिकारी नियुक्त करणार असून, 180 दिवसांच्या आत पूर्ण माहिती द्यावी लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button