breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सारा अली खानने तिचा फोटो शेअर करत केली स्वत:वरच कमेंट

बॉलीवूड अभिनेत्री सारा अली खानने नुकताच तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे..या फोटोमध्ये ती पारंपरिक वेशभूषेत दिसून येत आहे..साराने शेअर केलेला हा थ्रोबॅक कोलाज फोटो आहे..या फोटोत एका बाजुला आधीची सारा आणि दुस-या बाजुला आत्ताची सारा दिसतेय…

या फोटोची खासियत म्हणजे साराचा लूक..ज्यावेळी साराचा जुना फोटो क्लिक केला गेला होता तेव्हा साराचं वजन जास्त दिसत असून ती हेल्दी दिसतेय..साराच्या आत्ताच्या फोटोची जुन्या फोटोसोबत तुलना केल्यास यात खूप मोठा फरक जाणवेल..हा फोटो शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहीलंय, ‘काही गोष्टी कधी बदलत नाहीत.. जुन्या साडीतला फोटो, सेम पोज, सेम भावना आणि तसंच सजणं सवरणं..त्याच पद्धतीची खात्री..हा आणखी एक गोष्ट की ही लहान मुलगी थोडी विचीत्र दिसतेय, या विचित्र भावनांकडे दुर्लक्ष करा आणि माझ्या सुसंगत अशा सातत्याच्या पलिकडे जाऊन पहा..’

 साराने बॉलीवूडमध्ये पदार्पण करण्यासाठी वजन कमी केलं होतं..आणि यामुळेच ती अनेकदा लोकांना काहीही अशक्य नाही हे सांगताना दिसते.. सारा सतत जीमला जाते आणि स्वतःला फिट ठेवण्याचा प्रयत्न करते..लॉकडाऊनमध्येहीसाराने तिचं वर्कआऊट थांबवलेलं नाही..घरच्या घरी तुम्ही कसे व्यायाम करुन फिट राहु शकता याचे अपडेट्स तिने सोशल मिडियावर शेअरही केले होते.. 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button