breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सायकलदान महाअभियान ह्युमन्स सोसायटीचा उपक्रम

पिंपरी – गोरगरीब, गरजू विद्यार्थ्यांसाठी सायकल दान महाअभियानातून सायकल देण्यात येणार आहे. ही मोहिमेत पिंपरी-चिंचवड शहरातील ह्युमम्स सोसायटीतर्फे राबविण्यात येत आहे. पुणे व पिंपरी-चिंचवडमध्ये दि. 2 व 3 जून या कालावधीत ही मोहिम राबविण्यात आली. या सायकलदान अभियानाल सायकल दात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पिंपरी-चिंचवडमधून दोन दिवसांत 25 सायकली संकलीत करण्यात आल्या.

पिंपरी-चिंचवड आणि पुणे शहरामध्ये विविध 12 ठिकाणी सायकल संकलन केंद्र उभारण्यात आले आहे. पिपरी-चिंचवड शहरामध्ये आकुर्डी, निगडी, पिंपळे सौदागर, औंध, हिंजववडी, दिघी. तर पुण्यात नवी पेठ, हिंजवडी, हडपसर, धायरी, कोथरुड, एफ, सी रोड आदी ठिकाणी हे अभियान राबविण्यात येणार आहे.

पिंपरी-चिंचवडमध्ये आकुर्डीतील उपमहापौर शैलजा मोरे यांचे संपर्क कार्यालया ठिकाणी हे सायकलदान केंद्र उभारले आहे. यावेळी अनुप मोरे, संदीप रांगोळे, सूर्यकांत मुथियान, अशोक तनपुरे, तुषार शिंदे, लक्ष्मण शिंदे, समाधान पाटील, अभिषेक कांबळे, आकाश लांडे, शुभम वीर, अंगद गायकवाड, विकी राऊत, अजय पारवे आदी उपस्थित होते.

याबाबत बोलताना समाधान पाटील म्हणाले की, दुर्गम भागासह वाड्या वस्त्यावरुन पायपीट करत शिक्षण ग्रामीण भागातील मुले करत असतात. या विद्यार्थ्यांच्या मदतीसाठी काहीतरी शाश्वत मार्ग काढला पाहिजे या उद्देशाने ही सायकलदान महाअभियान राबविण्याचे ठरले. या सायकलदान अभियान राबविताना ग्रामीण भागातील विद्यार्थी हेच मोठे उद्देश डोळ्यांसमोर ठेवले आहे. या अगोदर मुंबई येथुन जवळपास 55 सायकली संकलीत करण्यात आल्या. दि. 15 जूनपर्यंत हा उपक्रम असून खालील दिलेल्या नंबरवर नागरिकांनी संपर्क करुन त्या सायकली घरी जाऊन घेण्यात येतील असेही त्यांनी सांगितले. तसेच सायकलदानात सायकली संकलित झाल्यानंतर त्या अहमदनगर जिल्ह्यातील अकोले याठिकाणी असणा-या विद्यार्थ्यांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. या उपक्रमात ह्युमन्स सोसायटीबरोबर प्रयोगवन आणि टीम एकलव्य यांचे सहकार्य मिळाले. ह्युमन्स सोसायटीमध्ये 25 जणांची टिम कार्यरत आहे.

सायकल देण्यासाठी इच्छुक असणा-यांनी समाधान पाटील (9028972975), अभिषेक कांबळे (8796120474) असे आवाहन सायकलदान महाअभियानांतर्फे करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button