breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सामाजिक जबाबदारी घेणारी पतसंस्था – श्रावण हर्डीकर

पिंपरी – मनपा सेवकांची पतसंस्था सभासदांचे आर्थिक हित जोपासत असतानाच सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शेतक-यांना मदत व्हावी या उद्देशाने राबवित असलेला तुरडाळ वाटप करणाच्या उपक्रम स्त्युत्य असल्याचे मत पिंपरी चिंचवड मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी व्यक्त केले.
पिंपरी चिंचवड मनपा सेवकांची पतसंस्थेच्या वतीने सभासदांना मोफत तुरडाळ वाटप करण्याचा उपक्रम राबविण्यात आला. त्याचे उद्‌घाटन आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पतसंस्थेचे अध्यक्ष आबा गोरे, उपाध्यक्ष संजय कुटे, खजिनदार महाद्रंग वाघेरे, सचिव सीमा सुकाळे, संचालक अंबर चिंचवडे, मनोज माछरे, मधुकर रणपिसे, राजाराम चिंचवडे, सतिश गव्हाणे, नथा मातेरे, रमेश चोरघे, भगवान मोरे, चारुशिला जोशी, महादेव बोत्रे, दिलीप गुंजाळ, यशवंत देसाई, नंदकुमार घुले, पतसंस्थेचे व्यवस्थापक नंदकुमार कोंढाळकर आदी उपस्थित होते.
पिंपरी चिंचवड महासंघाचे अध्यक्ष बबन झिंजुर्डे यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की, पिंपरी चिचंवड मनपा सेवकांची पतसंस्थेच्या वतीने बळीराजाला मदत व्हावी या उद्देशाने राज्य सरकारकडून तुरडाळ विकत घेऊन सभासदांना शेअर्सच्या प्रमाणात मोफत वाटप केली. यामध्ये एकूण 5367 सभासदांना जास्तीत जास्त पाच किलो तुरडाळ मोफत देण्यात आली. पतसंस्थेने राज्य सरकारच्या कृषी पणन विभागाकडून अठरा हजार किलो तुरडाळ विकत घेऊन सभासदांना त्याचे मोफत वाटप केले. असा उपक्रम राबविणारी पुणे जिल्ह्यातील एकमेव सहकारी संस्था असल्याची माहिती झिंजुर्डे यांनी दिली.
अध्यक्ष आबा गोरे यांनी सांगितले की, मार्च 2018 अखेर संस्थेने 9.36 कोटी रुपयांचा नफा मिळविला आहे. तर सभासदांच्या ठेवी 55.58 कोटी रुपयांच्या आहेत. मुदतकर्ज मर्यादा दहा लाख व अल्पमुदत कर्ज वीस लाख रुपये देणारी तसेच सलग तीन वर्ष ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविणारी हि संस्था आहे. थकीत कर्जाचे प्रमाण नगण्य आहे.
 स्वागत आबा गोरे, सुत्रसंचालन मनोज माछरे आणि आभार चारुशिला जोशी यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button