breaking-newsआंतरराष्टीय
इस्रायलच्या पंतप्रधानांविरुद्ध न्यायालयात आरोपपत्र
महाईन्यूज
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्यावर लाच घेतल्याचे तीन आरोप करण्यात आले असून त्याबाबत त्यांना असलेले संसदीय संरक्षण काढून घेण्याची घोषणा त्यांनी केल्याने या आरोपांबाबत त्यांच्यावर कायदेशीर कारवाईचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यानंतर इस्रायलच्या अॅटर्नी जनरलनी नेतन्याहू यांच्याविरुद्ध औपचारिक दोषारोप दाखल केले आहे.
या प्रश्नावरून घाणेरडे राजकारण होऊ नये यासाठी संसदीय संरक्षण काढून घेण्याची विनंती आपण केल्याचे नेतन्याहू यांनी म्हटले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी चर्चा करण्यासाठी नेतन्याहू वॉशिंग्टन येथे आले असून त्यांनी तेथूनच आपल्या फेसबुक पोस्टमार्फत वरील निर्णय जाहीर केलेला आहे.