breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सातवा वेतन आयोग : महापालिकेत भाजप-राष्ट्रवादीमध्ये श्रेयवादाची ‘लढाई’

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका कर्मचा-यांना सातवा वेतन आयोग लागू करण्याचा निर्णय सरकारने घेतला. मात्र, या निर्णयावरून राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. राष्ट्रवादीचे आमदार आण्णा बनसोडे यांनी हा निर्णय लागू झाल्याचे पालिकेत काल सोमवारी (दि. 23) पत्रकार परिषद घेऊन सांगितले. त्यावर पक्षनेते एकनाथ पवार यांनी आक्षेप घेतला असून भाजपच्या पाठपुराव्यामुळेच हा निर्णय झाला असून राष्ट्रवादी श्रेयासाठी केविलना प्रयत्न करत असल्याची टिका त्यांनी केली आहे.

सातवा वेतन आयोग लागू करण्याबाबत राज्य शासनाने महापालिका आयुक्तांना आदेश पाठविला. या आदेशावरून पालिका प्रशासन आणि कर्मचारी फायदा की तोटा, या संभ्रमात आहेत. परंतु, या निर्णयावरून राज्यातील सत्ताबदलामुळे राजकीय श्रेयवाद सुरू झाला आहे. राष्ट्रवादीने कर्मचारी महासंघाचे दोन्ही गट सोबत बसवून हा निर्णय अजित पवार आणि राष्ट्रवादीनेच घेतल्याची घोषणा केली. ऐवढेच नव्हे, तर राष्ट्रवादीचे आमदार बनसोडे यांनी भाजपने पाच वर्षात केवळ आश्वासनांची गाजरे वाटली. कर्मचारी महासंघाकडून सातत्याने पाठपुरावा सुरू होता. मात्र, भाजपने याबाबत निर्णय घेतला नसल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, राष्ट्रवादीने हे फुकटचे श्रेय घेतल्याची टिका भाजपकडून करण्यात आली. सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार म्हणाले की, महापालिका सर्वसाधारण सभा, स्थायी समितीकडून आम्ही वेळेत निर्णय करून दिला. वेळोवेळी शासनाकडे पत्रव्यवहार केला आहे. तसेच, शासनाने देखील 1 सप्टेंबर 2019 रोजी या संदर्भातला शासन आदेश काढला. भाजपच्या प्रयत्नातून हा निर्णय झालेला असताना सरकार बदलल्यामुळे राष्ट्रवादी श्रेयासाठी केविलवाणा प्रयत्न करत आहे. ते करताना त्यांना महाआघाडीतील घटक पक्षांचीही आठवण न झाल्याचे पवार यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button