breaking-newsमहाराष्ट्र

साईभक्तांसाठी खूशखबर; नववर्षात १० जादा विमान उड्डाणांची सेवा

शिर्डीत साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी नवीन वर्षांत १० उड्डाणे सुरु करण्यात आली आहे. देशातील प्रमुख शहरांसाठी रविवारी स्पाईस जेट कंपनीने ७८ आसनी ४ विमानांची सेवा शिर्डीतून सुरू करण्यात आली असून दररोज एकूण २० विमाने उड्डाणे होणार आहेत.

मागील वर्षी सुरु झालेले शिर्डी विमानतळाची वाटचाल यशस्वीरीत्या सुरु असून नवीन वर्षांत भाविकांच्या सुविधेसाठी स्पाईस जेट कंपनीने रविवारी देशातील प्रमुख शहरांसाठी ७८ आसनी ४ विमानसेवा सुरु केली आहे. पहिल्याच दिवशी या नवीन सेवांचा लाभ सुमारे १ हजार  भाविकांनी घेतल्याचे विमान कंपन्यांनी सांगितले.

दरम्यान, १ ऑक्टोबर २०१७ रोजी राष्ट्रपतींच्या हस्ते शिर्डीतील विमानतळ व विमान सेवेचे उद्घाटन करण्यात आले होते. शिर्डी विमानसेवेला आता वर्ष पूर्ण झाला असून विमानतळ व्हावे यासाठी १९९५ सालापासून प्रयत्न सुरू होते. अनेक अडचणींवर मात करत हे विमानतळ पूर्ण झाले. या विमानतळासाठी ३२० कोटी रुपये खर्च झाले असून ९ वर्षांत याचे काम पूर्ण झाले आहे. ऑक्टोबर २०१७ पासून मुंबई—शिर्डी व हैद्राबाद—शिर्डी या दोन सेवेचा प्रारंभ झाला. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर राज्यातूनही विमान सेवा सुरू करण्यात आली असून नोव्हेंबर २०१८ मध्ये स्पाईस जेटने शिर्डी ते दिल्ली हे १८९ आसनी बोईंग विमानसेवा दररोज सुरु करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील १० ठिकाणावरून विमानसेवेला सुरुवात झाली असून १० जानेवारी पासून चेन्नईसाठी स्पाईस जेट कंपनीचे १८९ सीटर बोईंग विमानसेवा सुरु होणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

स्पाईस जेट कंपनीने जयपूर, भोपाळ,बंगळुरू,अहमदाबाद या चार शहरांसाठी ७८ आसनी चार उड्डाणे सुरू केली आहेत. दरम्यान या सेवेमुळे साई भक्तांना दिलासा मिळाला आहे. या विमानतळावरून एअर इंडियाची एअर अलाएन्स ही कंपनी हैद्राबाद आणि मुंबईहून सेवा पुरवत आहे. तर स्पाईस जेट आता हैदराबाद, दिल्ली, भोपाळ, जयपूर, बंगलोर अशा फ्लाईट चालवते. रोज २० उड्डाणे सुरु झाल्याने याचा फायदा शिर्डीलाच होईल, अशी आशा व्यक्त होत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button