breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

चांदवडमध्ये सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

नाशिक – चार दिवसांपूर्वी गावाकडे सुट्टीवर आलेल्या एका भारतीय जवानाचे अपघातात निधन झाल्याची दुर्दैवी घटना चांदवड तालुक्यातील मनमाड परिसरात घडली. रमेश म्हातोरबा गुंजाळ (३७) असे या मृत जवानाचे नाव असून ते मूळचे चांदवडच्या रायपूर येथील रहिवासी होते.

जवान रमेश गुंजाळ हे भारतीय सुरक्षा दलाच्या बटालियन ७७ मध्ये सेवा बजावत होते. त्यांचे मूळ गाव चांदवड तालुक्यातील रायपूर असून त्यांचे कुटुंब सध्या मनमाड येथे वास्तव्यास आहे. सुट्टीवर गावी आलेले जवान रमेश हे मंगळवारी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास आपल्या रायपूर येथील आई-वडिलांना भेटून पुन्हा मनमाडला दुचाकीने चालले होते. त्याचवेळी वाटेत समोरून येणाऱ्या एका स्विफ्ट कारने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या भीषण अपघातात जवान रमेश यांचा जागीच मृत्यू झाला. तर सोबत असलेली त्यांची पत्नी आणि मुलगा हे दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर मनमाडच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जवान रमेश यांच्या या अपघाती निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. जवान रमेश यांच्यावर शासकीय इतमामात काल बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button