breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

केरळात करोनाचे आणखी नवे ५ रुग्ण आढळले

तिरुअनंतपुरम – भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढत असून आज केरळ राज्यात ५ नवे रुग्ण आढळल्याचे स्पष्ट झाले आहे. केरळच्या आरोग्यमंत्री के. के. शैलजा यांनी ही माहिती दिली. या बरोबर भारतातील करोना रग्णांची संख्या ३९ वर पोहोचली आहे. या पाचही रुग्णांची चाचणी पॉझिटीव्ह आली असून हे पाचजण इटलीहून परतले होते. या परतलेल्या लोकांमुळे पठ्ठ्णमतिठ्ठा जिल्ह्यातील दोघांना या विषाणूंची लागण झाली.

काल शनिवारी करोनाची लागण झालेले तीन नवे रुग्ण आढळले होते. त्यानंतर करोनाग्रस्तांचा संख्या झाली होती ३४. ओमानहून परतलेल्या तामिळनाडूतील एका व्यक्तीला करोनाची लागण झाली होती. या व्यतिरिक्त ईराणहून परकेल्या लडाखच्या दोन जणांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. अशा प्रकारे गेल्या २४ तासांच्या कालावधीत करोनाचे ८ नवे रुग्ण आढळले होते.

केरळात आढळलेल्या नव्या रुग्णांबाबत मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व पाच जणांची प्रकृती स्थिर आहे. या रुग्णांमध्ये दोन पुरुष, एक महिला आणि तिच्या नातेवाईकांचा समावेश आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button