breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सांगवी दापोडी पुल रस्त्याचे अखेर डांबरीकरण

पिंपरी ( महा ई न्यूज ) – सांगवी – दापोडीला जोडणा-या पवना नदीवरील डॉ.बाबासाहेब आंबेडकर पुलावर डांबराचा थर निघाल्याने खड्डे पडले होते. दापोडी, पिंपरी, पुण्याकडे  जाण्यासाठी या पुलाचा रहदारीसाठी मोठ्या प्रमाणावर वापर होतो. गेल्या काही महिन्यांपासुन येथील डांबराचा थर ठिकठिकाणी निघुन गेल्याने पुलावर छोटे खड्डे पडले होते. अनेकदा खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने दुचाक्या घसरण्याचे प्रकार येथे वारंवार घडत होते. तर खड्ड्यांमुळे वहातुक कोंडी होवुन रहदारीस अडथळा येत होता.

सकाळी व रात्री दापोडी सांगवी परिसरातील स्कुलबस, पिंपरी भोसरीकडे कामाला जाणा-या मंडळींची रहदारी या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर असते. तर सांगवीतुन दापोडी येथे शाळेसाठी पायी जाणा-या विद्यार्थ्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. पुलाच्या डाव्या वळणावर वसंतदादा पुतळा महानगर बसस्थानक आहे. पुणे शहर व विविध भागात येथुन पन्नासच्यावर बसगाड्यांच्या फे-या होतात. खड्डे चुकविण्याच्या नादात दुचाकी घसरून अनेकदा येथे किरकोळ अपघातही यापुर्वी घडले होते. पुलाच्या दोन्ही बाजुनी उतार रस्ता असल्याने वहाने वेगात असतात यातच डांबराचा थर निघाल्याने रस्ता खड्डेमय होवुन निसरडा झाला होता. जेष्ठ नागरीक, विद्यार्थी, पादचारी यांना येथुन रहदारीसाठी कसरत करावी लागत होती. खड्ड्यांच्या त्रासाबरोबरच वेगात येणारी वाहने यामुळे या ठिकाणी अपघाताचा धोका वाढला होता. येथील पुलरस्त्याची दुरूस्ती करण्यात यावी अशी मागणी नागरीकांमधुन होत होती. दरम्यान, नागरिकांच्या मागणीखातर सांगवी ते दापोडी रस्त्यावर डांबरीकरण करण्यात आले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button