ताज्या घडामोडी

सांगवी ते नारायणपूर बससेवा उत्साहात सुरू

पिंपरी (Pclive7.com):- भाजपचे सांगवी रहाटणी मंडळाचे उपाध्यक्ष ललित म्हसेकर यांच्या मागणीनुसार व भाजप शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या प्रयत्नातून पिंपळे गुरव ते सासवडमार्गे नारायणपूर बससेवा सुरू करण्यात आली आहे.
ललित म्हसेकर, पिंपळे गुरव येथील महिला व ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते बससेवेचा लोकार्पण सोहळा पिंपळे गुरव येथे झाला. श्री दत्तगुरूंच्या जयघोषात व टाळ- मृदंगाच्या गजरात बसचे स्वागत करण्यात आले. या बससेवेमुळे पिंपळे गुरव, सांगवी भागातील नागरिकांना नारायणपूर येथील श्री एकमुखी दत्त महाराजांच्या दर्शनाला जाता येणार आहे.
या बससेवेचा मार्ग पिंपळे गुरव, सांगवी, परिसरातून श्री क्षेत्र नारायणपूर येथे जाणाऱ्या भाविकांच्या सोईसाठी दर गुरुवार व पौर्णिमेच्या दिवशी बसमार्ग क्र. वाय १८ पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर (मार्गे सांगवी, दापोडी, खडकी बाजार, येरवडा, पुणे स्टेशन, हडपसर, सासवड) असा बसमार्ग प्रायोगिक तत्त्वावर सुरू करण्यात येत असून, त्या अनुषंगाने या मार्गाचे नवीन वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे.
या प्रसंगी पिंपळे गुरव ते श्री क्षेत्र नारायणपूर बसचालकांचा सन्मान नारायणपूर दत्त मंदिर येथे उद्योजक विजय पांडुरंग जगताप व मित्र परिवार यांच्या हस्ते करण्यात आला.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button