breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

CoronaVirus | ‘कोरोनाला जातीय रंग देऊ नका’-जे पी नड्डा

मुंबई | ‘कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कुणीही जातीय रंग देऊ नका. एवढंच नव्हे तर कुणीही कोणतेही ‘विभाजन किंवा मतभेद’ निर्माण करण्यास उदयुक्त करणारी विधान करू नका,’ अशी माहिती भाजप प्रदेशाध्यक्ष जे पी नड्डा यांनी म्हटले.

मार्च महिन्यात दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या तबलिगी जमातीच्या कार्यक्रमानंतर कोरोनाग्रस्त रूग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. या कार्यक्रमानंतर ४०० पॉझिटीव्ह रूग्णांची नोंद झाली आहे तर १५ कोरोनाग्रस्त रूग्णांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. गुरूवारी संध्याकाळी झालेल्या राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत जे पी नड्डा यांनी कार्यकर्त्यांना महत्वाचे आदेश दिले. ‘कोणत्याही पक्ष कार्यकर्ता किंवा नेत्याने कोणतंही भडकावू आणि फूट पाडणार वक्तव्य किंवा टीका करू नये. पंतप्रधानांनी घेतलेल्या निर्णयाप्रमाणेच इतर राज्यातील सरकारला पाठिंबा द्यावा. मग तेथे कोणत्याही पक्षाची सत्ता असू दे.’आपल्याकडे देशाचे नेतृत्व करण्याची मोठी जबाबदारी आहे. विषाणू आणि रोगाने जगभरातील प्रत्येकाला असुरक्षित बनविले आहे, अशावेळी आपण जबाबदारीने वागायला हवं असं नड्डा यांनी उपस्थितांना सांगितलं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button