breaking-newsताज्या घडामोडीपश्चिम महाराष्ट्र

सांगली जिल्हा बंद ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभे करणार – संभाजी भिडे

सांगली | संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याविरोधात केलेल्या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी उद्या सांगली बंदची हाक पुकारण्यात आली आहे. श्री शिवप्रतिष्ठानच्या वतीने बंदचं आवाहन करण्यात आलंय. सांगली जिल्हा बंद ठेवून संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन उभे करण्यात येणार आहे, अशी माहित संभाजी भिडे यांनी दिली आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या छत्रपती घराण्याबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ साताऱ्यात उदयनराजे भोसले समर्थकांनी निषेध आंदोलन केलं. संजय राऊत आणि जितेंद्र आव्हाडांविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. साताऱ्यातील पोवई नाक्यावर मोर्चा पोहोचल्यावर गाढवांच्या गळ्यात राऊत आणि आव्हाडांच्या नावाचे फलक लावण्यात आले होते. यावेळी सातारा बाजारपेठेतील अनेक दुकानंही बंद ठेवण्यात आली असून शहरात कडकडीत बंद पाळण्यात आला. संजय राऊत यांनी बुधवारी एका मुलाखतीत उदयनराजे यांना छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज असल्याचा पुरावा मागितला होता. त्यावरून उदयनराजेंचे समर्थक आक्रमक झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button