breaking-newsTOP NewsUncategorizedताज्या घडामोडीराष्ट्रिय

तामिळनाडू विधानसभेसाठी रजनीकांत-कमल हसन एकत्र? वाचा काय म्हणाले कमल हसन

तामिळनाडूचे राजकिय वातावरण चांगलेच रंगणार असेच दिसून येत आहे. तामिळनाडूमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहे. त्या दृष्टीने आतापासूनच राजकीय हालचाली सुरू झाल्या आहेत. सुपरस्टार रजनीकांतने 31 डिसेंबरला राजकीय पक्षाची घोषणा करणार असल्याची जाहीर केले होते. तर त्याआधी अभिनेते कमल हसन यांनी देखील ‘मक्कल निधी मय्यम’ या पक्षाची स्थापना केली होती.

आता विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने हे दोन्ही अभिनेते एकत्र येणार का ? अशा चर्चा सध्या सुरू झाल्या आहेत. कमल हसन यांनी मैत्रीचा हात पुढे केला असून, रजनीकांत यावर काय निर्णय घेतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. कमल हसन यांनी एकत्र येण्याचे संकेत दिले आहेत.

काय म्हणाले कमल हसन

माझ्याप्रमाणेच तेदेखील बदलासाठी लढत आहेत. रजनीकांत यांनी पक्षाबाबत सविस्तर माहिती दिलेली नाही. आम्ही फक्त एका फोनकॉलच्या अंतरावर आहोत. एकत्र काम करणे शक्य असल्यास आम्ही त्याबाबत निश्चितच विचार करू.

2018 साली कमल हसन यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या उपस्थितीत ‘मक्कल निधी मय्यम’ या राजकीय पक्षाची घोषणा केली होती. तर आता नवीन वर्षाच्या पुर्वसंध्येला रजनीकांत आपल्या पक्षाची जाहीर घोषणा करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button