breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सहा महिन्याच्या बाळाला मिळाली दृष्टी

डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया यशस्वी

पिंपरी महाईन्यूज

पिंपरीतील डॉ. डी. वाय. पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र येथे नुकतेच एका सहा महिन्याच्या मुलीला दोन्ही डोळ्याने दिसत नव्हते तिच्या कुटंबीयांनी रुग्णालयातील नेत्ररोग विभागात बाल नेत्र रोग तज्ज्ञ नेत्रचिकित्सा विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉ. परीक्षित गोगटे यांच्याशी संपर्क साधला त्यांनी या बाळाची तपासणी केली आणि असे निदान झाले की तिच्या दोन्ही डोळ्यांना जन्मजात रुबेलासिन्ड्रोम मुळे मोतीबिंदू हा आजार जडला आहे.

नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ. रेणू मग्दुम यांनी त्यांना सल्ला दिला रुग्ण बाळ दोन्ही डोळ्यांनी अंध आहे. आणि जर या स्थितीकडे लवकरात लवकर लक्ष दिले नाही तर भविष्यात तिची दृष्टी येण्याची शक्यता नाही असे सांगितले व त्यांनी कुटूंबियांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यानुसार तिच्या दोन्ही डोळ्यांची शस्त्रक्रिया करून मोतीबिंदू काढण्यात डॉक्टरांना यश मिळाले. ही दुर्मिळ व अवघड शस्त्रक्रिया करून या सहा महिन्याच्या अंध बाळाला दृष्टी मिळाली. सदर शस्त्रक्रिया राज्य शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेमार्फत मोफत करण्यात आली.

“बाल मोतीबिंदू व तिरळेपणा शस्त्रक्रिया आणि इतर अनेक डोळ्यासंदर्भातील प्रक्रिया आमच्या नेत्ररोग विभाग, डॉ. डी वाय पाटिल पाटील वैद्यकीय महाविद्यालय, रुग्णालय व संशोधन केंद्र, पिंपरी पुणे येथे करण्यात येत असून विभागामध्ये उपलब्ध अत्याधुनिक तंत्रज्ञान व उत्कृष्ट पायाभूत सेवा सुविधांमुळे आणि तज्ञ् डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे जटिल जन्मजात दुर्मिळ बाल मोतीबिंदू शस्त्रक्रिया पूर्ण करण्यास यश मिळाले” असे मत नेत्ररोग विभाग प्रमुख डॉ रेणू मग्दुम यांनी व्यक्त केले ते पुढे म्हणाले “आमच्या नेत्ररोग विभागामार्फत असंख्य नेत्र शस्त्रक्रिया यशस्वी केल्या आहेत. दोन्ही डोळ्यांचे मोतीबिंदू काढण्याची दुर्मिळ व अवघड अशी शस्त्रक्रिया करण्यात आम्हाला यश मिळाले व या सहा महिन्याच्या बाळाला दृष्टी मिळाली आहे आणि ती सामान्य जीवन जगत आहे याचा आम्हाला मनापासून अभिमान वाटतो”.

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील, उपाध्यक्षा डॉ. भाग्यश्रीताई पाटील, संचालिका डॉ. स्मिता जाधव ट्रस्टी व कोषाध्यक्ष डॉ. यशराज पाटील यांनी बाल मोतीबिंदू शस्त्रक्रियेत सहभागी सर्वांचे कौतुक केले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button