breaking-newsमनोरंजन

…म्हणून वीणा-शिवला होणार शिक्षा

बिग बॉस मराठीचं दुसरं पर्व सुरु होऊन आता बरेच दिवस झाले आहेत. या दिवसांमध्ये घरात अनेक नवनवीन बदल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. घरातून अनेक सदस्य घराबाहेर पडले. तर त्यांची कमतरता दूर करण्यासाठी नव्या सदस्यांचा प्रवेश झाला. त्यामुळे घरात रोज नवनवीन बदल घडताना दिसून येतात. त्यातच घरामध्ये नुकताच अभिजीत बिचुकलेंचा प्रवेश झाला आहे. त्यामुळे या खेळाला नवं वळण मिळालं आहे. अभिजीत बिचुकलेच्या उपस्थितीत घरामध्ये ‘तहानलेला कावळा’ हा कॅप्टनसीसाठीचा नवा टास्क रंगणार असून यावेळी वीणा आणि शिवला एका चुकीमुळे शिक्षा मिळणार आहे.

कॅप्टनसीसाठी आता घरामध्ये तहानलेला कावळा हा नवा टास्क रंगणार असून यामध्ये बिग बॉसने काही नियम आखून दिले आहेत. या नियमांचे उल्लंघन कोणीही करु शकत नाही. मात्र या नियमांचे शिव आणि वीणाकडून उल्लंघन झालं आहे. त्यामुळे आता त्यांना या साऱ्याची शिक्षा मिळणार आहे.

बिग बॉस सगळ्या सदस्यांच्या निदर्शनास आणून देणार आहेत की, कार्यादरम्यान दिलेल्या सामुग्रीचा फक्त कार्यातच वापर करायचा आहे. पण, कार्यादरम्यान शिव आणि वीणा यांनी कार्यासाठी दिलेल्या खड्यांचा वैयक्तिक भावना प्रदर्शित करण्यासाठी वापर केला. त्यामुळे त्यांना ही शिक्षा मिळणार असून या शिक्षेचं स्वरुप काय असेल हे गुलदस्त्यात आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button