breaking-newsमनोरंजन

सलमानचा “रेस 3′ आमिरने बघू नये अशी फॅन्सची ईच्छा

सलमानचा “रेस 3′ रिलीज झाला. सलमानच्या फॅन्स व्यतिरिक्‍त इतर सेलिब्रिटीजनाही हा सिनेमा बघण्याची खूप ईच्छा आहे. यामध्ये आमिर खानही आहे. त्याने ट्विट करून सलमानला हा सिनेमा बघण्याची आपली ईच्छा असल्याचे कळवलेही आहे. मात्र आमिरच्या फॅन्सना मात्र असे वाटत नाही. “रेस 3′ आमिरने बघूच नये असे आमिरच्या फॅन्सला वाटते आहे. आमिरने आपल्या ट्विटमध्ये म्हटले होते की “रेस 3′ त्याला आणि त्याच्या कुटुंबियांनाही बघायचा आहे.

सिनेमाचा ट्रेलर बघूनच घरच्यांना सगळ्यांनाच “रेस 3′ नक्की आवडेल अशी खात्रीही आमिरने व्यक्‍त केली होती. हा सिनेमा एक ब्लॉकबस्टर ठरेल आणि सगळी रेकॉर्डही तोडेल, अशी आशा व्यक्‍त करताना आमिरने सलमानला खूप शुभेच्छाही दिल्या आहेत. मात्र आमिरच्या फॅन्सनी या ट्विटला रिट्विट केले आणि “रेस 3′ अगदी खराब सिनेमा असल्याचे आपले अभिप्राय पोस्ट करायला सुरुवात केली. यातील ऍक्‍शन अगदीच वाईट आहे, इथपासून त्या क्रिमिनलच्या फालतू सिनेमाला एवढे कशाला वाढवता, इथपर्यंत अनेक टीकात्मक पोस्ट पडल्या आहेत. एकाने तर सलमानचा हा सिनेमा सुपर फ्लॉप ठरणार हे आमिरलाही माहिती असल्याचे म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button