breaking-newsराष्ट्रिय

सलग अठराव्या दिवशीही डिझेल पेट्रोल च्या दरात वाढ

नवी दिल्ली : भारतीय बाजारात डिझेलच्या दरात वाढ सुरुच आहे. राजधानी दिल्लीमध्ये डिझेल पेट्रोलपेक्षा महाग होण्याची ही पहिलीच वेळ आहे. आज (24 जून) सलग अठराव्या दिवशी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. तर पेट्रोलचे दर कालएवढेच आहेत मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात प्रति लिटर 10.48 रुपयांनी वाढ झाली आहे. तर पेट्रोलही 8.50 रुपयांनी महागलं आहे.

आंतरराष्ट्रीय बाजारात मागील 18 दिवसांपैकी बरेच दिवस दिवस क्रूड ऑईलचे दर सामान्यच राहिले. पण भारतीय बाजारात याचे दर सतत वाढत आहेत. सध्या कच्च्या तेलाची किंमत 40 डॉलर प्रति बॅरलच्या जवळपास आहे. पण पेट्रोल-डिझेलच्या किमतीत त्या हिशेबाने कमी झालेल्या नाहीत. त्याचाच परिणाम म्हणून मागील 18 दिवसात डिझेलच्या दरात 10.48 रुपये प्रति लीटरने वाढ झाली हे. या अठरा दिवसात पेट्रोलचे दरही 8.50 रुपये प्रति लिटर वधारले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button