breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सरकारीसह खाजगी रुग्णालयातील जागांची आकडेवारी डॅंश बोर्डवर द्या

आयुक्त श्रावण हर्डिकर यांना विरोधी पक्षनेते नाना काटे यांचे पत्र

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड शहरातील खाजगी व सरकारी रुग्णालयांमध्ये सामान्य नागरिकांना ऑक्सिजन व व्हेंटीलेटरच्या किती जागा उपलब्ध आहेत. याबाबत कोविडच्या डॅशबोर्ड दैनंदिन प्रसिध्द करण्यात याव्यात, सारथी हेल्पलाईनवर कोरोनाची सर्व माहिती देवून समुदेशनही करावे, तसेच कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता कृतीशील आराखडा लवकर करण्यात यावा. अशी मागणी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केली आहे.

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना संसर्गांचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. शहरात अखेर ८ हजार ७६२ सकारात्मक कोरोना बाधित सापडले आहेत. सुमारे ३ हजार २६० कोरोना बाधितांवर वेगवेगळ्या रुग्णालयात वैद्यकीय उपचार सुरु आहेत. सध्या शहरात कोरोनाग्रस्तांची स्थिती गंभीर झालेली आहे. जुलै – ऑगस्टमध्ये सुध्दा कोरोना बाधित रुग्णांची संख्या वाढून १० ते १५ हजार होईल. असा आरोग्य विभागाचा अंदाज आहे.

सध्या शहरातील नागरिक भयभयीत झाले आहेत. त्यामुळे खाजगी आणि सरकारी रुग्णालयातील कोरोनासाठी किती बेड अथवा जागा शिल्लक आहेत. सामान्य, ऑक्सिजन व व्हेंटीलेटरवरील किती जागा शिल्लक आहेत. हे मध्यवर्ती यंत्रणा उभारुन शहरातील रुग्णांना समजल्यास रुग्णांना नेमकी माहिती मिळून त्या रुग्णालयात दाखल होऊन त्याचा वेळ वाचेल.

तसेच सरकारी व खाजगी रुग्णालयाची कोरोना बाधित रुग्ण ठेवण्याची क्षमता आताच संपलेली आहे. त्यामुळे येथून पुढे कोरोना बाधित रुग्णांसाठी वेगळी सोय करावी लागणार आहे. यासाठी सक्षम आराखडा तयार करण्यात आलेला आहे काय ? कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे रुग्णांसाठी पिंपरी येथील एच.ए. कंपनीच्या मोकळ्या जागेवर तात्पुरत्या स्वरुपाचे ५००० बेडचे रुग्णालय उभारण्यात यावे. कोरोना रुग्णावर तत्काळ कृतीशील आराखडा तयार करुन या रुग्णांसाठी मनपा प्रशासनास करावी लागेल, असेही काटे यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button