breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

सरकारकडून मराठा समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र – अशोक चव्हाण

सांगली –  मराठा आरक्षण आंदोलनावरून मराठा समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र सूरु आहे, असा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी केला आहे. तसेच आता चर्चेचे गुर्हाळ नको, आरक्षण पाहिजे, ही लोकांची भावना असून आरक्षणासाठी शिवसेनेकडे जालीम उपाय आहे. शिवछत्रपतींचे नाव घेणाऱ्या सेनेने सरकारचा पाठिंबा काढल्यास सत्ता जाईल, या भीतीने तर हे सरकार आरक्षण देईल, असेही चव्हाण यांनी स्पष्ट केले.
सांगली महापालिकेच्या निवडणूक प्रचारानिमित्ताने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी मराठा आरक्षणावरून सरकार जोरदार हल्लाबोल केला. तसेच ते पुढे म्हणाले की, राज्यात आरक्षणासाठी मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. पण हे सरकार मराठा आंदोलकांना काठ्यांनी सोलून काढत आहे. तर दुसरीकडे आता हे सरकार चर्चेसाठी पुढे आले आहे.  आता मराठा आरक्षणाबाबत चर्चेचे गुर्हाळ नको आहे, आरक्षण पाहिजे, मागील मोर्चा वेळी सुद्धा अशीच चर्चा झाली. परंतू, प्रत्यक्षात काही झालं नाही, त्यामुळे आता लोकांना चर्चा नको, निर्णय हवा असल्याची तीव्र भावना आहे.
तसेच कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण दिले पाहिजे. यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे असं मतही यावेळी अशोक चव्हाण यांनी व्यक्त केले आहे. भीमा कोरेगावपासून मराठा आरक्षण आंदोलनापर्यंत मराठा समाजात फूट पाडण्याचे षडयंत्र सुरू आहे. ही फूट पडू शकणार नाही असे स्पष्ट करत महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडून होणाऱ्या वक्तव्याचा समाचार घेतला.  मराठा आरक्षण आंदोलनाची चळवळ बदनाम कशाला करता ? सरकार मधील व्यक्तींनी बेताल वक्तव्य करू नये , असा सल्ला काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांना दिला आहे. तसेच मुख्यमंत्री यांचे पंढरपुर आणि सांगली महापालिका निवडणूक प्रचाराचे झालेले दौरे रद्द वरून बोलताना पंढरपूर मध्ये साप सोडण्यात येणार होते. पण राज्याचे प्रमुख म्हणून त्यांनी पंढरपुर मध्ये जायला पाहिजे होते.  सांगली मध्ये साप कोणी सोडणार नव्हते, मग सांगलीला का आले नाहीत. राज्याच्या प्रमुखांना जनतेसमोर यायला भीती का वाटावी, असा सवाल उपस्थित करत जनतेसमोर जाऊ शकत नाही याचा अर्थ मुख्यमंत्र्यांना आत्मविश्वास राहिलेला नाही. अशी टीका अशोक चव्हाण यांनी मुख्यमंत्री यांच्यावर केली आहे.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button