breaking-newsक्रिडाताज्या घडामोडी

समितीच्या बैठकांना दांड्या मारल्यानं सचिन तेंडुलकर आणि विश्वनाथन आनंद मोदी सरकारच्या क्रीडा समितीमधून बाहेर…

महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर आणि बुद्धिबळाचा बादशाह विश्वनाथन आनंद यांना केंद्रातील मोदी सरकारने खेळाशी संबंधित समितीमधून बाहेरचा रस्ता दाखवला आहे. मोदी सरकारने दोन्ही दिग्गजांना डिसेंबर 2015 मध्ये स्थापन केलेल्या अखिल भारतीय क्रीडा परिषदेतून काढलं आहे. देशात खेळाच्या विकासाशी संबंधित मुद्द्यांवर सल्ला देण्यासाठी  केंद्र सरकारने या समिती स्थापन केली होती.

नवे सदस्य म्हणून क्रिकेटर हरभजन सिंह आणि के. श्रीकांत यांचा समावेश करण्यात आला आहे. तत्कालीन क्रीडामंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी डिसेंबर 2015 मध्ये याची स्थापना केली होती. डिसेंबर 2015 पासून मे 2019 पर्यंत समितीच्या पहिल्या कार्यकाळात सचिन तेंडुलकरचा राज्यसभा खासदार आणि विश्वनाथन आनंदचा खेळाडू म्हणून समावेश करण्यात आला होता.

त्याच प्रमाणे समितीमध्ये सदस्यांची संख्याही कमी करण्यात आली आहे. समितीमध्ये आता 27 ऐवजी 18 सदस्य असतील. सचिन आणि आनंदशिवाय बॅडमिंटनचे प्रशिक्षक पुलेला गोपीचंद तसंच माजी फुटबॉलपटू बायचुंग भुतिया यांनाही हटवण्यात आलं आहे. समितीच्या बैठकांना गैरहजर राहिल्याने त्यांना हटवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button