breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

समाजप्रिय युवा नेतृत्व हे ख-या अर्थाने आदर्श युवा व्यक्तिमत्व  – गिरीष बापट

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – सक्षम युवा नेतृत्व कसे असावे याचे उदाहरण द्यायचे असेल, तर ते अमित गोरखे यांना समोर ठेवावे लागेल. माणसाने जीवनात कधी खचून जायचे नसते. अमित गोरखे हे समाजप्रिय असलेले युवा नेतृत्व ख-या अर्थाने आदर्श व्यक्तिमत्व आहेत,असे  गौरवौउदगार पालकमंत्री गिरिष बापट यांनी चिंचवड येथील सोहळ्यात काढले.
निमित्त होते युवा नेते अमित गोरखे यांच्या अभिष्टिचिंतन वाढदिवसाचे. पालकमंत्री गिरीष बापट यांच्या उपस्थितीत केक कापण्यात आला. यावेळी आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, सत्तारुढ पक्षनेते एकनाथ पवार, आमदार महेश लांडगे, सदाशिव खाडे, माजी खासदार गजानन बाबर, माजी उपमहापौर शैलजा मोरे, स्विकृत सदस्य सुनील कदम, महेश  कुलकर्णी, बाबू नायर, मधुकर बाबर, नगरसेविका शर्मिला बाबर, नगरसेवक अमित गावडे, सुजाता पलांडे, नामदेव ढाके, तुषार हिंगे, शीतल शिंदे,  प्रियंका बारसे, अनुप मोरे, नगरसेविका वैशाली काळभोर, सुलक्षणा धर, चंद्रकांता सोनकांबळे, अ प्रभाग अध्यक्षा अनुराधा गोरखे, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष सदाशिव खाडे, विलास जेऊरकर आदी उपस्थित होते.
बापट म्हणाले की, व्यक्ती ही त्याच्या कर्तृत्वाने मोठी होते. आयुष्याचा दिनक्रम यातून नाराज न होता जो मणूस पुढे जातो, तो इतरांच्यापेक्षा आगळा वेगळा असतो. माणसाने जीवनांत खचून निराश व्हायच नाही. राजकारणात वयाची अडचण नसते. व्यक्तीच्या नाव, जातीच्या पेक्षा, धर्मापेक्षा तिच्या गुणांचे पूजन केले जाते. दोन जाती, दोन धर्म, दोन संस्कृती, दोनच पक्ष मानतो. एक आमच्या बरोबर असणारे व येणारे. आमच्याबरोबर तुम्ही येणार आहात, असा मार्मिक टोला त्यांनी लगावला.
आमदार लक्ष्मण जगताप म्हणाले, खासदार गजानन बाबर यांच्या अनुभव व मताला आम्ही प्राधान्य देऊ. पिंपरी विधानसभा आरपीआयला सोडला, तर खासदार गजानन बाबर तुम्ही म्हणताल, त्या व्यक्तीला आम्ही तिकिट देऊ. त्यामुळे योग्य त्या व्यक्तीचा पक्ष विचार करेल. शिक्षण, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रातील संगम  म्हणजेच युवा नेतृत्व अमित गोरखे, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. त्यांच्या कामातील निष्ठा व सातत्य ह्या गोष्टी वाखाणण्यासारख्या आहेत, असे जगताप म्हणाले.
महापौर राहूल जाधव, आजपर्यंत त्यांनी केलेली कार्ये समाजात आदर्श निर्माण करणारी आहेत. लोकांना सुदृढतेचा मार्ग दाखवण्यासाठी नेहमी ते प्रयत्नशील असतात. त्यामुळे या तरुण नेतृत्वाकडून अभ्यासू असण्याची सर्वांनाच अपेक्षा असते. शैक्षणिक क्षेत्राबरोबरच त्यांचे सामाजिक कार्यही मोठे आहे.
भोसले म्हणाले, पेपर टाकण्याचे  काम करुन अमित मनपाच्या  शाळेत जात असत. हे काम करताना त्याच्यातील शिस्त, वेळ पाळणं ह्या गोष्टी दिसत होत्या.
दरम्यान अमित गोरखे यांनी चिंचवडच्या विविध भागांत वर्तमानपत्रे टाकण्याचे काम संदेश न्यूज पेपर एजन्सीमध्ये केले आहे. त्या एजन्सीचे मालक रत्नकांत भोसले यांचा सत्कार पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आला.
नॉव्हेलचे संचालक विलास जेऊरकर यांचाही सत्कार पालकमंत्री गिरीष बापट यांच्या हस्ते करण्यात आला.  माजी खासदार गजानन बाबर, सिनेअभिनेते राहूल सोलापूरकर, सदाशिव खाडे ,एकनाथ पवार, मधुकर बाबर, यांचीही भाषणे झाली.
कार्यक्रमाचे आभार अनुराधा गोरखे यांनी मानले.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button