TOP NewsUncategorizedताज्या घडामोडीमहाराष्ट्र

‘सत्यजित तांबे यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये’; अंकिता पाटलांचे प्रत्युत्तर

इंदापुरात आयोजित युवक काँग्रेस मेळाव्यात युवक काँग्रेस प्रदेशाध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्यावर निशाणा साधला. शंकरराव पाटलांचा काँग्रेसी विचार त्यांच्या वारसांनी नाही तर इंदापुरच्या काँग्रेस कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी जपला, अशी टीका त्यांनी केली होती. यावर हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

सत्यजित तांबे यांनी लहान तोंडी मोठा घास घेऊ नये. तुमचे संधीसाधू राजकारण हे तर संपूर्ण राज्याला माहिती आहे. मोठ्या नेत्यावर बोललं म्हणजे आपण मोठे होत नसतो तर त्यासाठी काम करावं लागतं, अशा शब्दात अंकिता पाटील यांनी तांबेंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

वाचाः मुंबईमध्ये आज रात्री 11 ते उद्या पहाटे 6 पर्यंत कडक नाईट कर्फ्यू- मुंबई पोलिस

हर्षवर्धन पाटील यांनी केलेले सहकार्य ते विसरले आहेत. हर्षवर्धन पाटील यांच्यावर टीकाटिप्पणी करण्यापूर्वी त्यांच्या राजकीय कारकिर्दीएवढे आपले वयदेखील नाही, याची जाणीव सत्यजित तांबे यांनी ठेवायला हवी होती. ज्येष्ठ नेत्याविषयी बोलताना त्यांनी राजकीय संकेत पाळणे आवश्यक होते, असा टोला त्यांनी यावेळी लगावला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button