breaking-newsUncategorizedपिंपरी / चिंचवड

सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर व धान्य वाटप

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिकेचे सत्तारुढ पक्षनेते नामेदवराव ढाके यांच्या वाढदिवसानिमीत्त रक्तदान शिबीर आणि धान्याचे किट वाटप करण्यात आले. शिवनगरी येथील जनसंपर्क कार्यालय परिसरात घेण्यात आलेल्या शिबीरामध्ये ३० पिशव्या रक्त संकलन करण्यात आले. यासाठी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वायसीएम रुग्णालय रक्तपेढीच्या सहकार्याने सामाजिक अंतर ठेवून हा उपक्रम राबविण्यात आला. तत्पूर्वी, कोरोनाच्या पार्श्वभुमिवर सर्व रक्तदात्यांना सॅनिटाईज करून टेम्प्रेचर गण ने त्यांची तपासणी करण्यात आली.

सध्या देशात व राज्यभरात लॉकडाऊन सुरु असून १ मे महाराष्ट्र दिन व कामगार दिन त्यातच सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके यांचा ५० वा वाढदिवस कार्यक्रम कुठलाही अनावश्यक खर्च न करता गोरगरिबांना मदतीची भावना लक्षात घेवून साध्या पद्धतीने साजरा करण्याचा निर्णय ढाके यांनी घेतला होता. त्या अनुषंगाने, पिंपरी चिंचवड शहरात कामानिमीत्त आलेल्या परंतु, लॉकडाऊनमुळे अडकलेल्या परराज्यातील आणि परजिल्ह्यातील कामगारांना दोन वेळचे जेवण उपलब्ध व्हावे, यासाठी पिंपरी चिंचवड महापालिका प्रभाग क्रमांक १७ मधील बळवंत कॉलनी, श्रीराम कॉलनी, मातोश्री कॉलनी शिवनगरी भागातील गोरगरिब, कष्टकरी, हातावर पोट असलेल्या ४६० कामगारांना घरपोच सोशन डिस्टींशन राखून पक्षनेते ढाके यांच्याहस्ते पंधरा दिवस पुरेल इतके सहा प्रकारचे धान्य आणि तेल पाऊच असलेले किट वाटप करण्यात आले. त्याचबरोबर, गेल्या महिन्याभरापासून सकाळी –संध्याकाळी ९०० लोकांचे जेवण पुरविण्यात येत असून सामाजिक बांधिलकीतून हा उपक्रम राबविण्यात येत असल्याची प्रतिक्रीया ढाके यांनी व्यक्त केली.

या उपक्रमासाठी कैलास रोटे, वसंत नारखेडे, शुभम ढाके, योगेश महाजन, राहुल पाचपांडे, अरविंद महाजन, कुणाल इंगळे, शंकर पाटील, अशोक बोडखे, रविंद्र ढाके, योगेश चिनावले, कुशल नेमाडे, चंद्रकांत ढाके, मनोज ढाके, कैलास पाटील, सचिन वाणी, संजय पाटील, एकनाथ सरोदे, रुपेश पाटील, प्रदीप ढाके, राकेश चौधरी, चेतन महाजन आदींनी परिश्रम घेतले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button