breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सत्ताधारी-विरोधकांमध्ये एकमत न झाल्याने स्थायीची सभा तहकूब

सुमारे दीडशे ते दोनशे कोटीचे विषय मान्यतेसाठी अजेंठ्यावर 

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या विविध विभागातून शहरातील विकास कामांचे विषय स्थायी समिती सभेपुढे सुमारे दीडशे ते दोनशे कोटीचे अजेंठ्यावर मंजुरीला ठेवले आहेत. त्या विषयावर स्थायी समितीतील सत्ताधारी -विरोधी पक्षाच्या सदस्यांमध्ये एकमत होत नाही. अनेक मोठ्या विषयातील आर्थिक गणिते जूळुन न आल्याने स्थायी समितीची आज (मंगळवार) दुस-यांना सभा तहकूब करण्याची नामुष्की सत्ताधारी भाजप आली आहे.   

यावेळी सभापती ममता गायकवाड सभेच्या अध्यक्षस्थानी होत्या.  महानगरपालिका स्थायी समितीची यापुर्वी 26 डिसेंबर 2018 रोजी होणारी सभा गणसंख्येअभावी तहकूब केली होती. त्यानंतर  आजही (मंगळवारी) स्थायी सभा तहकुब करण्यात आली. या सभेत अभिनेते कादर खान आणि नगरसेवक बाबू नायर यांचे वडील एम. शंकरनारायणन नायर यांना श्रद्धांजली वाहून दोन्ही सभा शुक्रवार (दि.4) दुपारी दीड वाजेपर्यंत तहकूब करण्यात आल्या आहेत.

महापालिकेच्या स्थायी समिती विषयपत्रिकेवर पंतप्रधान आवास योजनेच्या आकुर्डी, पिंपरीतील गृहप्रकल्प ( सुमारे 84 कोटी),  यशवंतराव चव्हाण रुग्णालयातील पदव्युत्तर अभ्यासाक्रमासाठी आवश्यक कामे करणे ( सुमारे 32 कोटी), च-होली येथील चोविसवाडी, वडमुखवाडी 18 मीटर रस्ता विकसित करणे (19 कोटी 72 लाख रुपये), विशालनगर जगताप डेअरी ते मुळा नदीवरील पुला पर्यंतचा 24 मीटर रुंद रस्ता अर्बन स्ट्रीट डिझाईननुसार विकसित करणे  (14 कोटी 40 लाख 66 हजार रुपये), आकुर्डी रेल्वे स्टेशन ते गुरुद्वार चौका पर्यंतचा 18 मीटर रस्ता अर्बन डिझाईननुसार विकसित करणे (आठ कोटी 91 लाख रुपये) यासह सुमारे दोनशे कोटीच्या रुपयाची विषय  स्थायी समितीसमोर मंजुरीसाठी ठेवले आहेत.

दरम्यान, सत्ताधारी भाजप स्थायी समिती सदस्यांनी कोणतेही सबळ कारण न देता दोन्ही वेळा स्थायीची सभा तहकूब करण्यात आली. सभा तहकूबीमुळे अनेक विषयाची मान्यता लांबणीवर पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button