breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

सत्ताधारी भाजप नव्हे तर हा राजकीय पक्ष लढवत आहे सर्वाधिक जागा

मुंबई : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या (Maharashtra Assembly Elections 2019) प्रचाराला चांगलाच जोर दिसून येत आहे. स्थानिक तसेच राष्ट्रीय नेत्यांच्या दिवसाला एकाचवेळी चार ते पाच सभा होत आहे. त्यामुळे निवडणुकीच्या आखाड्यात प्रचाराची रंगत दिसून येत आहे. निवडणूक प्रचार संपायला केवळ ४८ तास शिल्लक आहेत. शेवटच्या टप्प्यात सर्वच पक्षांनी प्रचारासाठी जोर लावला आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार, अमोल कोल्हे यांच्या प्रचार सभांचा धडाका दिसून येत आहे. 

तसेच भाजपकडून पंतप्रधान मोदी, अध्यक्ष अमित शाह यांच्या सभा घेण्यात येत आहेत. काँग्रेसकडून राहुल गांधी, माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, शिवसेनेकडून उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे यांच्या सभा होत आहेत. महाराष्ट्रात एकूण ३२३७ उमेदवार विधानसभा निवडणुका लढवत आहेत. गुरुवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार बहुजन समाज पक्ष (बसपा) जास्तीत जास्त जागा लढवत आहे. बसपा २६२ तर भाजप १६४ जागांवर लढत आहे. १४ युतीचे उमेदवारही निवडणूक रिंगणात आहेत. भारतीय कम्युनिस्ट पार्टी १६, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आठ जागांवर लढत आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button