breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

सतत टिका करणा-या शिवसेनेने महापालिका आयुक्तांचे केले अभिनंदन

यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाची निविदा रद्द केल्याबद्दल जाहीर अभिनंदन

पिंपरी |महाईन्यूज |प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांचा कार्यकाळ पुर्ण झालेला आहे. गेल्या अडीच-तीन वर्षात शिवसेनेने संधी सापडेल तिथे आयुक्तांवर टीका करुन आंदोलने केली. त्याच आयुक्तांचे आज (मंगळवारी) पत्रक काढून जाहीर अभिनंदन केले आहे. कारण, 742 कोटी रुपयांचे यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाची निविदा रद्द केल्याने शिवसेना पुणे जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी हे पत्रक काढले आहे.

आयुक्त श्रावण हर्डिकर यांना उबाळे यांनी दिलेल्या पत्रकांत म्हटले आहे की, यांत्रिकी पध्दतीने साफसफाई कामाच्या निविदेमुळे हजारो सफाई कामगारांवर अन्याय होणार होता. त्यांचे कुटूंबही उद्ध्वस्त होणार होते. आम्ही ही निविदा रद्द करण्यासाठी आंदोलने केली. कारण काही जणांना आर्थिक फायदा व्हावा म्हणून ही निविदा काढण्यात आली होती. कोरोना सारख्या महामारीत देखील सफाई कामगार जीव धोक्यात घालून काम करीत आहेत.

दरम्यान, यापुढे निविदा काढताना कामगारांचा विचार करुन काढावी, आपल्या स्वच्छ व सुंदर शहरात त्या सफाई कामगारांचा सिंहाचा वाटा आहे. याचा विसर सत्ताधारी पदाधिकारी व प्रशासन यांना पडू नयेही असेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button